‘बिग बॉस मराठी’ सिझन ५मधील सर्वात जास्त वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर. भलेही जान्हवीला विजेते पद मिळवता आले नसले तरी ती विशेष चर्चेत होती. प्रेक्षकांनी अनेकदा तिच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली होती. आता जान्हवी छोट्या पडद्यावरील एका मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. चला जाणून घेऊया तिच्या मालिकेविषयी...
जान्हवी किल्लेकर लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील 'अबोली' मालिकेत काम करताना दिसणार आहे. गौरी कुलकर्णी, सचित पाटील, शर्मिष्ठा राऊत ही कलाकार मंडळी या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. या गेल्या तीन वर्षात मालिकेत खूप रंजक ट्विस्ट आलेले पाहायला मिळत आहेत. अनेक कलाकार या मालिकेत आले आणि गेले मात्र मालिकेच्या कथानकामुळे अजूनही ही मालिका तग धरुन आहे. अशातच आता मालिकेत आणखी एक मोठं वळण येणार आहे. मालिकेत दोन नव्या पात्रांची एंट्री होणार असल्याचं समोर आलं आहे.
‘अबोली’ मालिकेत आता दोन नव्या पात्रांची एंट्री होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मधील चर्चेत असलेली स्पर्धक जान्हवी किल्लेकर या मालिकेत दिसणार आहे. जान्हवी ‘बिग बॉस मराठी’नंतर आता अबोली मालिकेतून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. या मालिकेत ती पोलीस अधिकारी महिलेची भूमिका साकारणार आहे. तिच्या व्यक्तिरेखेचं नाव दीपशिखा भोसले आहे.
वाचा: गोविंदाच्या या चित्रपटाचा अनोखा विक्रम, कथा लिहिण्यापूर्वी शूट करण्यात आली गाणी
सोशल मीडियावर या मालिकेचा हा नवा प्रोमो तुफान व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये, इन्स्पेक्टर दीपशिखा चौकशी करताना संशयिताला पट्ट्याने मारत असते. इतक्यात अबोली येऊन दीपशिखाला अडवते आणि “अंकुश सरांच्या पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्याची ही पद्धत नाहीये” असं तिला सांगते. यावर, “ही आता अंकुशची नव्हे तर इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटीलची चौकी आहे” असं उत्तर दीपशिखा देते. पुढे, अबोली म्हणते, “कोणाचीही चौकी असो, जो कायद्याने चालणार नाही त्याला अबोली वकिलीचा हिसका दाखवणार”.
संबंधित बातम्या