Bigg Boss Marathi Season 5 Day 34 : 'इंडियन आयडल १'चा विजेत आणि सर्वांचा आवडता गायक अभिजीत सावंत सध्या 'बिग बॉस मराठी ५'च्या घरात सर्वांची मने जिंकताना दिसत आहे. त्याचा प्रेक्षकांना आपल्या सुमधूर आवाजाने मंत्रमुग्ध तर केलेच आहे त्यासोबतच त्याचा बिग बॉसच्या घरातील खेळ देखील सर्वांना आवडत आहे. पण अनेकदा अभिजीतला टार्गेट केले जाते. आता त्यावर अभिजीतच्या पत्नीने पोस्ट केली आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात दोन टीम पडलेल्या दिसत आहेत. टीम ए मध्ये निक्की, अरबाज, जान्हवी, वैभव, घनःश्याम हे स्पर्धक पाहायला मिळत आहेत. तर टीम बीमध्ये अभिजीत, अंकिता, पॅडी, धनंजय, सूरज, आर्या हे स्पर्धक पाहायला मिळाले. मात्र, भाऊचा धक्का झाल्यानंतर स्पर्धकांच्या या टीम काहीशा कोलमडलेल्या दिसल्या. मात्र ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिजीत पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची मन जिंकताना दिसत आहे.
टीम बीचा चांगला खेळाडू आणि एक लीडर म्हणून अभिजीतकडे पाहिले जाते. पण अभिजीत आणि निक्कीमधील मैत्री पाहून टीम बी मधील स्पर्धक नेहमीच भांडणे करताना दिसतात. त्यांनी अभिजीतला देखील त्यांच्या टीमचा सदस्य मानण्यात देखील नकार दिला. मात्र, नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये अभिजीतच्या पायाला दुखापत झाली असताना त्याने टीमसाठी पातळ लोकमध्ये जाऊन नाणी शोधून आणण्याचा निर्णय घेतला. कारण, पातळ लोकमध्ये जायला त्याची पार्टनर निक्कीने नकार दिला. अभिजीतचा टास्क पाहून सर्वांनी कौतुक केले.
वाचा: ‘तारक मेहता...’ मालिकेतील अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ७ वर्षांनंतर पतीपासून विभक्त होणार!
अभिजीतचा खेळ पाहून त्याच्या पत्नीने देखील कौतुक केले आहे. अभिजीतच्या बायकोने त्याचा खेळ पाहून इन्स्टाग्रामला स्टोरी पोस्ट केलेली पाहायला मिळत आहे. “मला तुझा अभिमान आहे. तुला खेळायला कोणत्याही ग्रुपची आवश्यकता नाही. याउलट त्यांना तुझी गरज आहे. माझ्या भक्कम माणसा”, असे म्हणत अभिजीतची पत्नी शिल्पा सावंत हिने नवऱ्याचे कौतुक करत त्याला पाठिंबा दर्शवला आहे.
नुकताच बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेटेड कार्य पार पडले. त्यामध्ये निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर आणि वर्षा उसगावकर हे नॉमिनेटेड आहेत. आता यांपैकी कोणता कलाकार घराबाहेर पडतो हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.