मराठी मनोरंजनाचा बॉस अर्थात 'बिग बॉस मराठी'चा नवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाचा पाचवा सिझन हा प्रेक्षकांसाठी खास ठरत आहे. कारण सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये कलाकारांसोबतच काही सोशल मीडिया इन्फ्लूएंसर देखील सहभागी झाले आहेत. तसेच यंदा बिग बॉसच्या घरातील स्पर्धक हे त्यांच्या मर्यादा सोडून वागताना दिसत आहेत. ते पाहून अनेक कलाकार संताप व्यक्त करत आहेत. कालच्या बिग बॉसच्या भागात जान्हवी किल्लेकर वर्षा उसगावकर यांच्याशी भांडत होती. ते पाहून एका अभिनेत्रीने व्यक्त केला संताप.
बिग बॉस मराठीचा सिझन ५ सर्वजण पाहात आहेत. त्यामध्ये मराठी कलाकार देखील आहेत. नुकताच अभिनेत्री मेघा धाडेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. तिने थेट प्रेक्षकांना जान्हवी किल्लेकर नॉमिनेशमध्ये आली तर तिला सोडू नका असे आवाहन केले आहे. नेटकऱ्यांनी देखील मेघाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत पाठिंबा दिला आहे.
मेघा धाडाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट्या स्टोरीला पोस्ट शेअर केली आहे. 'माझ्या लाडक्या बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांनो ही आगाऊ कार्टी जान्हवी नॉमिनेशनला आलीच तर तिला सोडू नका. तिला बाहेरचा रस्ता नक्की दाखवा. तिला वोट आऊट करण्याची माझी कळकळीची विनंती आहे' या आशायची पोस्ट मेघाने केली आहे. त्यानंतर आणखी एक पोस्ट करत मेघाने शोचा सूत्रसंचालक रितेश देशमुखता देखील विनंती केली आहे. 'मला आजही आठवते आहे हिंदी बिग बॉसच्या घरात सलमान खान सरांनी प्रियांका जग्गा आणि स्वामी ओम यांना त्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे घरातून बाहेर काढून टाकले होते. अशीच अॅक्शन जान्हवी किल्लेकरसोबत घेतली जाईल अशी आशा आहे. रितेश सर कृपया तिला घराबाहेर काढा. आम्हाला असे स्पर्धक पाहायचे नाहीत. आम्ही विनंती करतो' या आशयाची पोस्ट तिने केली आहे.
Phir Aayi Hasseen Dillruba Review: पंडीत करणार राणीचे आयुष्य उद्ध्वस्त! वाचा 'फिर है हसीन दिलरुबा'चा रिव्ह्यू
जान्हवी किल्लेकरने वर्षा उसगावकर यांचा अपमान केला. इतकेच काय तर त्यांना शासनाने दिलेल्या पुरस्कारांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. बिग बॉसच्या घरात झालेल्या भांडणात जान्हवीने 'तुमची ही घाणेरडी अॅक्टींग माझ्यासमोर करु नका' वर्षा यांना म्हटले. त्यावर वर्षा ताई लगेच 'असं कसं मला अॅक्टिंगसाठी शासनाचा पुरस्कार मिळालाय. तो ही तीन वेळा' असे बोलतात. ते ऐकून जान्हवी अक्षरश: तिच्या मर्यादा ओलांडताना दिसते. 'आता त्यांना पश्चाताप होत असेल ह्यांना का दिला आपण तो पुरस्कार. किती चांगले चांगले अभिनेते आहेत बाहेर. त्यांना नाही मिळाला आणि तुम्हाला मिळाला' असे जान्हवी म्हणाली.