छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी ५' नुकताच सुरु झाला आहे. दोन वर्षे वाट पाहिल्यानंतर अखेर हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवसापासून जोरदार भांडणे होताना दिसत आहेत. मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याशी निक्की तांबोळीचे वागणे पाहून सर्वजण संतापले आहेत. आता अभिनेता पुष्कर जोगने तर थेट पोस्ट शेअर करत निक्कीला सुनावले आहे.
निक्की तांबोळी ही घरात होणाऱ्या छोट्या छोट्या वादांमध्ये अतिशय चुकीची आणि खालच्या पातळीची भाषा वापरत असल्याचे वर्षा उसगावकर यांनी म्हटले. तसेच निक्कीने नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेश टास्कमध्ये वर्षा यांना “काळ्या मनाच्या मॅम, ब्लॅक हार्टेड” असा उल्लेख केला. त्यामुळे निक्कीचे हे वागणे मराठी इंडस्ट्रीमधील इतर कलाकारांना खटकणारे वाटले. अभिनेता पुष्कर जोगने तर पोस्ट लिहित निक्की तांबोळीला चांगलेच सुनावले आहे.
अभिनेता पुष्कर जोग हा बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये दिसला होता. आता निक्कीचे वागणे पाहून तो म्हणाले, “निक्की तुला मॅनर्स कळतात का? मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्रीला असं अपमानित होताना पाहून खरंच खूप वाईट वाटतं. हे अत्यंत खेदजनक आहे. वर्षा उसगांवकर मॅमना अशा पद्धतीने वागवणं चुकीचं आहे. हा खेळ खेळायची एक विशिष्ट पद्धत आहे आणि हा गेम खेळताना आपण आपली मर्यादा सोडून चालत नाही. वर्षा मॅम मी तुमच्याबरोबर आहे.”
पुष्करने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने कलर्स मराठी वाहिनीला देखील टॅग केले आहे. पुष्करची ही पोस्ट पाहून अनेकांनी निक्कीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आता येत्या शनिवारी रितेश भाऊ निक्कीची शाळा घेणार का? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा : 'कॅमेरासमोर जाईल की महाराष्ट्राचा छोटा पुढारी गुदगुल्या करतो', कोल्हापूरच्या गड्यावर संतापला घनःश्याम
बिग बॉस मराठी ५च्या घरात पहिल्यांदाच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण आणि पुरुषोत्तमदादा पाटील हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. त्यामधील कोणत्या स्पर्धकाचा प्रवास आज संपणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या