Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिजीत बिचुकलेची एण्ट्री, येताच सदस्यांचा केला पाणउतारा-bigg boss marathi day 63 abhijit bichukale and rakhi sawant entry ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिजीत बिचुकलेची एण्ट्री, येताच सदस्यांचा केला पाणउतारा

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिजीत बिचुकलेची एण्ट्री, येताच सदस्यांचा केला पाणउतारा

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 28, 2024 12:14 PM IST

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'चा एक नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात एण्ट्री करताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi Day 63 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांना आज चांगलाच धक्का मिळणार आहे. कारण बिग बॉसच्या घरात आज राखी सावंतची एण्ट्री झाली आहे. राखीच्या येण्याने अनेकांना आनंद झाला आहे. आता राखीसोबतच घरातील स्पर्धकांची शाळा घेण्यासाठी आणखी एक स्पर्धक शोमध्ये शहभागी होत आहे. या स्पर्धकाचे नाव आहे अभिजीत बिचुकले. अभिजीतच्या येण्याने आज घरात वाद, भांडणे, राडा, गोंधळ, ड्रामा असं सर्वकाही पाहायला मिळणार आहे.

बिचुकलेची बिग बॉसच्या घरात

कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बिग बॉस मराठी'च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले एण्ट्री करताना दिसत आहेत. घरात येताच अभिजीत बिचुकले म्हणतात, "डॉ. अभिजीत बिचुकलेचा सादर नमस्कार." अभिजीतच्या एन्ट्रीला 'मैं हूँ डॉन" हे गाणं खास वाजवण्यात आलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा त्याच्या स्टाईलने धुमाकूळ घालताना दिसून येईल.

नव्या प्रोमो व्हायरल

'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकले सदस्यांचा पाणउतारा करताना दिसणार आहे. तसेच त्यांची अनोखी स्टाइल देखील दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहयला मिळत आहे की अंकिताची शाळा घेत बिचुकले म्हणतोय, "बहिण असे कधीच करत नाही, कुचकेपणा तुमचा दिसला. राग येतोय मला... मी काहीही फोडू शकतो या घरातले." आता बिचुकले का चिडले आहेत हे बिग बॉस मराठीचा आजचा एपिसोड पाहिल्यावर कळणार आहे. प्रेक्षकांमध्ये या भागाची उत्सुकता शिगेला पोहाचली आहे.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर बिग बॉस मराठीचा हा नवा प्रोमो तुफान व्हायरल झाला आहे. या प्रोमोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'संपूर्ण महाराष्ट्र हा सूरजची बाजू घेत आहे' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'बिग बॉस प्रेक्षकांचं म्हणणं इतक पण मनावर घायच नव्हतं राखी आणी बिचुकले दोघांना बरोबर पाठवले' असे म्हटले आहे.
वाचा: रमेश सिप्पी यांनी 'शोले'चे दिग्दर्शन केलेले नाही; सचिन पिळगावकर यांचा चकीत करणारा खुलासा

कोणता स्पर्धक जिंकणार शो?

बिग बॉस मराठी सिझन ५ ची फिनाले ६ ऑक्टोबर रोजी आहे. सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, वर्षा उसगावकर, जान्हवी किल्लेकर, पांडुरंग कांबळे, धनंजय पोवार हे स्पर्धक बिग बॉसच्या घरात सध्या आहेत. आता यंदाची ट्रॉफी कोणाच्या हातात असणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Whats_app_banner