Bigg Boss Marathi: आता राडा होणार! वाईल्ड कार्ड एण्ट्री होताच संग्रामने दिली अरबाजला धमकी-bigg boss marathi day 44 wild card entry sangram chaughule threaten arbaaz patel ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi: आता राडा होणार! वाईल्ड कार्ड एण्ट्री होताच संग्रामने दिली अरबाजला धमकी

Bigg Boss Marathi: आता राडा होणार! वाईल्ड कार्ड एण्ट्री होताच संग्रामने दिली अरबाजला धमकी

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 09, 2024 08:38 AM IST

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात नुकताच एक संग्राम चौघुलेची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. त्याने घरात येताच अरबाज पटेलला धमकी दिली आहे.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi Day 44 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीचा या आठवड्याचा गणपती स्पेशल भाऊचा धक्का चांगलाच गाजला. रितेश देशमुखने स्पर्धकांची चांगलीच मजा घेतली. या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून घन:श्याम दरवडेने निरोप घेतला. अशातच याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात या सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. संग्राम चौगुले असे या या स्पर्धकाचे नाव आहे. संग्राम कसा खेळ खेळणार याकडे आता सर्वांचच लक्ष लागलं आहे. दरम्यान, त्याने बिग बॉसच्या घरात एण्ट्री करताच अरबाज पटेलला धमकी दिली आहे.

संग्रामने दिली अरबाजला धमकी

नुकताच कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस मराठीच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. व्या प्रोमोमध्ये संग्राम आपल्या नावाची पाटी घेत घरात एन्ट्री करताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत संग्रामने घरात एन्ट्री घेतली आहे. घरात येताच संग्रामने अरबाजला फुल ऑन धमकी दिली आहे. आतापर्यंत तू जी पॉवर दाखवलीस ती वीक माणसाला दाखवली आहेस, असं घरात येताच संग्राम अरबाजला म्हणाला आहे.

'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये झाली सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणजेच संग्राम चौगुले. आता नव्या सदस्याच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलतील ? नात्यांमध्ये काय बदल होतील ? कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत येईल आणि कोण सेफ होईल ? म्हणजेच येणारा आठवडा खूप आव्हाात्मक आणि उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आगामी भागाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

संग्रामच्या येण्याने अरबाजचे वागणे बदलणार का? आता निक्की कुणाच्या टीममध्ये राहणार? हे पाह ण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
वाचा : अरबाजच्या जागी सूरज असता तर निक्कीला काय म्हणाला असता? 'माझ्या बच्चा' पाहा मजेशीर व्हिडीओ

कोण आहे संग्राम चौगुले?

बॉडीबिल्डर संग्राम चौगुले सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. त्याचे दीड मिलियन फॉलोअर्स आहेत. फिटनेसवर त्याने प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आजवर त्याने अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्याने सहा वेळा मिस्टर इंडिया आणि पाच वेळा मिस्टर महाराष्ट्राच्या किताबावर आपले नाव कोरले आहे. त्याची स्वत:ची एक आलिशान जीमदेखील आहे. आता तो बिग बॉसच्या घरात कसा खेळणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Whats_app_banner