संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन नुकताच पार पडला. खेडे गावातून अतिशय खडतर प्रवास करून बिग बॉस पर्यंत पोहोचलेल्या सूरज चव्हाणने बिग बॉस मराठी ५ची ट्रॉफी जिंकली. संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती की सूरज चव्हाण हा बिग बॉसचा विजेता बनवा आणि त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे सूरजचे कौतुक केले होते. पण आता सूरज जिंकलेल्या रक्कमेचे काय करणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
सूरज चव्हाणला ‘बिग बॉस मराठी ५’च्या ट्रॉफीसोबतच रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. बक्षीस म्हणून त्याला १४.६ लाख रुपयांची रक्कम मिळालीच, पण सोबतच त्याच्यावर इतर बक्षिसांचा देखील वर्षाव झाला. त्याला तुनवाल मोटर्सकडून एक शानदार इलेक्ट्रिक स्कूटर देखील भेट म्हणून देण्यात आली आहे. त्याची ही मोठी झेप पाहून आता सगळेच त्याचे भरपूर कौतुक करताना दिसत आहेत.
सूरजला मिळालेल्या १४.६ लाख रुपये रक्कमेचे तो काय करणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर सूरजने सांगितले की तो जिंकलेल्या पैशातून स्वत:साठी घर बांधणार आहे. त्या घराला बिग बॉस असे नाव देणार आहे. स्वत: सूरजने याविषयी सांगितले आहे.
टिक टॉक या अॅपने सूरजला प्रसिद्धी मिळवून दिली होती. तो टिक टॉक वरील टॉप व्हिडीओ क्रिएटर्सपैकी एक होता. तो चांगले पैसे कमावत होता. तसेच प्रसिद्ध असल्यामुळे त्याला अनेक कार्यक्रमांना देखील बोलावण्यात येत होते. बिग बॉसच्या घरात असताना सूरज म्हणाला होता की, तो फक्त एखाद्या उद्घाटन सोहळ्याला जाण्यासाठी ८० हजार रुपये घ्यायचा. पण अनेक जवळच्या लोकांनी त्याची फसवणूक देखील केली. आता सूरज एका दिवसाचे ३० ते ४० हजार रुपये घेतो.
सूरजने गप्पा मारताना सांगितले होते की, 'याआधी माझी खूप फसवणूक झाली आहे. त्यामुळे माझ्या बहिणींना खूपच काळजी वाटते. तू फक्त सुधार आम्हाला खूप बरं वाटेल असे बहिणींनी सांगितले असल्याचे सूरज म्हटला.'
वाचा: बॉलिवूडमध्ये १९८०साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमामुळे झाले होते रेल्वेचे नुकसान, चित्रपटही ठरला फ्लॉप
केदार शिंदे यांच्या आगामी सिनेमात सूरजला काम करण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच 'राजाराणी' चित्रपटात आपला दमदार अभिनय करताना तो दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी 'राजाराणी'च्या पोस्टरने सर्वांची मनं जिंकली होती. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित एक प्रेमकथा उलगडणार आहे, ज्यामध्ये सुरज महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या