Suraj Chavan : सूरज चव्हाणच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये खरंच गडबड की प्रसिद्धीचा फंडा? ‘त्या’ पोस्ट डिलीट झाल्याने चर्चा!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suraj Chavan : सूरज चव्हाणच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये खरंच गडबड की प्रसिद्धीचा फंडा? ‘त्या’ पोस्ट डिलीट झाल्याने चर्चा!

Suraj Chavan : सूरज चव्हाणच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये खरंच गडबड की प्रसिद्धीचा फंडा? ‘त्या’ पोस्ट डिलीट झाल्याने चर्चा!

Published Nov 12, 2024 10:28 AM IST

Suraj Chavan Social Media Apology : सूरजच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेदरम्यान, त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही महत्त्वाच्या पोस्ट डिलीट झाल्या आहेत.

Suraj Chavan : सूरज चव्हाणच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये गडबड
Suraj Chavan : सूरज चव्हाणच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये गडबड

Suraj Chavan Social Media Apology : सोशल मीडियावर आपला गुलीगत पॅटर्न दाखवून सगळ्यांची मनं जिंकून घेणारा सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी ५’मुळे घराघरांत पोहोचला. त्याने बिग बॉस मराठीच्या घरात केवळ एन्ट्रीच घेतली नाही तर, या सीझनचं विजेतेपद देखील पटकावलं. तेव्हापासून ­सगळीकडे सूरज चव्हाणची हवा आहे. मात्र, आता सूरज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकतीच सूरज चव्हाण याने सोशल मीडियावरून सगळ्यांची अंकिता प्रभू वालावलकर आणि जान्हवी किल्लेकर यांची आणि आपल्या सगळ्या चाहत्यांची माफी मागितली आहे. 

सूरजच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेदरम्यान, त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही महत्त्वाच्या पोस्ट डिलीट झाल्या आहेत. या पोस्टमध्ये त्याच्या अनेक सहकाऱ्यांसोबतचे फोटो होते. सूरजने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली असून, त्याने या पोस्ट डिलीट होण्याबद्दल माफीही मागितली आहे.

सूरजने मागितली माफी!

सूरज चव्हाणने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली. त्याने लिहिले, ‘नमस्कार मी आपल्या सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका सुरज चव्हाण. माझ्या इन्स्टाग्राम अकाउंटचा काही प्रॉब्लेम झाल्यामुळे काही खूप महत्त्वाच्या पोस्ट्स डिलीट झाल्या आहेत. त्यामध्ये माझ्या अंकिता ताई आणि जान्हवी ताईच्या पण पोस्ट होत्या. यापुढे मी स्वतः लक्ष देईल आणि काळजी घेईल. तरीही आपणा कुणाचे मन दुखावले असतील तर मोठ्या मनाने मला माफ करा.’

बिग बॉस मराठीचं कुटुंब सूरजच्या भेटीला

सूरजने ज्या पोस्ट्सबद्दल माफी मागितली, त्यात अंकिता वालावलकर आणि जान्हवी किल्लेकर यांच्याबरोबरचे फोटो सामील आहेत. या पोस्टमध्ये 'बिग बॉस'च्या घरातील विविध स्पर्धकांसोबत सूरजने गोड आठवणी शेअर केल्या होत्या. दिवाळीच्या खास वेळी, धनंजय पोवार, वैभव चव्हाण, इरिना, जान्हवी किल्लेकर, आणि 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अंकिता प्रभू वालावलकर यांनी सूरजची भेट घेतली होती. त्याचवेळी सूरजने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते.

Suraj Chavan : ना लिहिता येतं ना वाचता, मग सूरज चव्हाण फोन कसा वापरतो? लोकांचे नंबर कसे लक्षात ठेवतो?

तर, जान्हवी किल्लेकरने सूरजच्या गावी जाऊन ट्रॅक्टर चालवला होता आणि अंकिता वालावलकरने सूरजच्या कुटुंबीयांसोबत शेतात जेवण केले होते. या सर्वांनी सूरजसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते, परंतु सध्या हे सर्व फोटो आणि व्हिडीओ सूरजच्या इन्स्टाग्रामवरून डिलीट झाले आहेत.

नेमकं काय झालं?

सूरज चव्हाण एक साधा, अशिक्षित व्यक्ती असल्यामुळे त्याला सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करावा, याबाबत फारसा ज्ञान नाही. त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटची देखरेख काही जवळचे मित्र करत असतात. त्यामुळे या पोस्ट डिलीट होण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही लोक त्याला प्रसिद्धीची हवा लागल्याचे म्हणत आहेत. तर, काही लोकांच्या मते, हे सर्व एका तांत्रिक अडचणीमुळे घडले असावे, मात्र यावर अधिक माहिती समोर आलेली नाही. त्याच्या सोशल मीडियावर यापूर्वीही फसवणुकीच्या घटना घडल्या होत्या, ज्यात त्याच्या नावाने काही लोकांनी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळीही सूरजने खुलासा करत त्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्याच्या या इन्स्टाग्राम पोस्टच्या संदर्भात काहीही अपप्रवृत्त्या घडल्यास, त्याने सोशल मीडियावर अधिक सावध राहण्याचे वचन दिले आहे.

Whats_app_banner