Suraj Chavan Video: छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन पार पडला. या सिझनचा सूरज चव्हाण हा विजेता झाला. आता हा रिअॅलिटी शो संपल्यावर सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घरात असताना त्याचा साधेपणा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होता. आता सोशल मीडियावर सूरजचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो सिमेंटच्या गोणी उचलत असल्याचे दिसत आहे. ते पाहून नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे.
सूरज चव्हाण हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत त्याच्या आयुष्यातील व्हिडीओ झापूक झुपूक स्टाइलमध्ये शेअर करताना दिसतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सूरज टेम्पोमधून सिमेंटच्या गोणी काढताना दिसत आहे. दरम्यान, सूरजच्या अंगाला लागलेले सिमेंट, त्याचा साधेपणा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर सूरजचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
सूरजने बिग बॉसमध्ये असताना एक इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणजे स्वत:चे घर बांधण्याची. तो या घराचे नाव बिग बॉस असे ठेवणार आहे. या घरासाठी त्याला त्याची सह्स्पर्धक अंकिता वालावलकर हिने देखील काही तरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसांपूर्वीच सूरजच्या घराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या घराच्या कामासाठीच सूरज सिमेंटच्या गोणी उचलत असेल असा अंदाज लावला जात आहे. पण नेमकं सत्य काय आहे हे अद्याप समोर आलेले नाही.
Pushpa 2 The Rule review: 'पुप्षा २' पाहायला जाताय? थांबा! आधी हे वाचा आणि मग निर्णय घ्या
सूरजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एका यूजरने, “भाऊ घराचे काम सुरु केले का” असा प्रश्न विचारला आहे. तर दुसऱ्या एका यूजरने “जमिनीवर पाय असणारा माणूस” असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने, “यश काय आहेत माहित नाही पण माणूस जमिनीवर आहे हे नक्की” अशी कमेंट केली आहे. “कोणत्याही कामाची लाज नसावी भावा. खूप अभिनंदन तुझ्या घराचे काम चालु आहे. तू त्यांना मदत करत असशील, ग्रेट” असे म्हणत एका यूजरने सूरजचे कौतुक केले आहे.