मराठी मनोरंजनाचा बॉस अर्थात 'बिग बॉस मराठी'चा नवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाचा पाचवा सिझन हा प्रेक्षकांसाठी खास ठरत आहे. कारण सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये कलाकारांसोबतच काही सोशल मीडिया इन्फ्लूएंसर देखील सहभागी झाले आहेत. त्यातीलच एक चर्चेत असणारं नाव म्हणजे गोलीगत सूरज चव्हाण. सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असणारा सूरज चव्हाणने प्रेक्षकांना विशेष स्टाईलने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. पण आता मात्र तो कोणालाही न घाबरता आपल्या स्टाईलने सर्वांना गोलीगत चीत करताना दिसून येणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी उत्कर्ष शिंदे पुढे आला आहे.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस मराठी ५च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सूरज निक्की तांबोळीला चॅलेंज करताना दिसून येत आहे. त्यावर निक्की तांबोळी सूरजला म्हणते,"तू मला चॅलेंज करतोस ना...तू विचार पण करू शकत नाही की तू माझं असं रुप पाहशील." त्यानंतर कन्फेशन रुममध्ये 'बिग बॉस' सूरजला म्हणतात,"सूरज न घाबरता खेळा." त्यानंतर सूरज म्हणताना दिसतोय,"आता मी नसतो कोणाला भीत... कारण मी आहे गोलीगत टॉपचा किंग."
सध्या सोशल मीडियावर सूरज आणि निक्कीचा हा प्रोमो तुफान व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत सूरजला पाठिंबा दिला आहे. एका यूजरने 'तू लढ भावा, ज्यांनी केला सूरजचा नाद त्यांना तो करणार गोलीगत बाद' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'आपला भाऊ गोलीगत, नड तू' असे म्हटले आहे. दरम्यान, लोकप्रिय गायक उत्कर्ष शिंदेने देखील या प्रोमोवर कमेंट केली आहे. त्याने 'तुम सब उसको डरा सकते हो, हरा नहीं सकते' असे म्हणत सूजरला पाठिंबा दिला आहे.
सूरजचे चाहते आणि नेटकरी त्याला चांगलच सपोर्ट करताना दिसत आहेत. गोलीगतची नवी स्टाईल नक्की कशी असेल, नव्या खेळीने तो नक्की काय करणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना आता उत्सुकता लागली आहे.
वाचा: 'कॅमेरासमोर जाईल की महाराष्ट्राचा छोटा पुढारी गुदगुल्या करतो', कोल्हापूरच्या गड्यावर संतापला घनःश्याम
सूरज चव्हाणने 'टिक टॉक'च्या पहिल्या दहात स्थान मिळवले होते. त्याचा गुलिगत हा डायलॉग तुफान चर्चेत असायचा. त्याला बिग बॉसच्या घरात पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. सूरजचे आता इन्स्टाग्राम अकाऊंटवर ९ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो मूळचा बारामतीचा आहे.
संबंधित बातम्या