
'बिग बॉस मराठी'चा खेळ आता अंतिम टप्प्यावर आला आहे. लवकरच हा खेळ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यात घरात मिड विक एव्हिक्शन पार पडलं असून महाराष्ट्राची लाडक्या वर्षा ताईंनी या घराचा निरोप घेतला आहे. वर्षा ताई जिंकाव्या अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. पण कुठेतरी त्यांचा खेळ कमी पडला. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील कोणाचा प्रवास संपणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता प्रभू - वालावलकर , धनंजय पोवार आणि सूरज चव्हाण यांच्यापैकी एका सदस्याचा प्रवास संपणार होता.
'बिग बॉस मराठी'च्या घराचा निरोप घेतल्यानंतर वर्षा ताई म्हणाल्या,"मला असं वाटलं होतं की मी रेडकार्पेटवर जाईल. फायनलिस्टमध्ये असेन. पण शेवटी जनतेची इच्छा नियतीची इच्छा असते.आज मी घराचा निरोप घेत आहे हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. शेवटपर्यंत राहण्याची माझी इच्छा होती... पण हरकत नाही. सगळी स्वप्न आपल्या मनाप्रमाणे होत नाही. हा खेळ खेळण्याचं मी धाडस दाखवलं."
वर्षा ताई घराबाहेर पडताना त्यांनी घरातील इतर सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ९० च्या दशकातील महानायिका वर्षा उसगांवकर या 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाणाऱ्या पहिल्या सदस्य ठरल्या होत्या. स्वप्नसुंदरी, महिलांची लाडकी स्टाईल आयकॉन आणि ड्रीमगर्ल अशी वर्षा उसगांवकर यांची ओळख. 'बिग बॉस मराठी'च्या घरातही त्यांनी आपल्या प्रभावी मराठी भाषेने, आणि आपल्या हटके स्टाईलने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं.
वाचा: मुंबईतील 'या' शापित बंगल्याने उद्ध्वस्त केले तीन मोठ्या स्टार्सचे करिअर, वाचा कुठे आहे हा बंगला
आता ६ ऑक्टोबर रोजी बिग बॉसचा ग्रँड फिनाले होणार आहे. १०० दिवसांचा असणारा हा शो ७० दिवसांमध्येच गुंडाळण्यात आला आहे. तसेच शोचा सूत्रसंचालक रितेश देशमुख हा मधे काही दिवस गायब असल्याचे पाहायला मिळाले. आता येत्या ६ ऑक्टोबरला शोचा ग्रँड फिनाले होणार आहे. यावेळी कोणता स्पर्धक दिसणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. निक्की तिकिट टू फिनाले घेऊन फायनलमध्ये पोहोचली आहे. तर त्यानंतर अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता प्रभू - वालावलकर , धनंजय पोवार आणि सूरज चव्हाण हे आता बिग बॉसच्या घरात आहेत. कोणता स्पर्धक विजेता ठरणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या
