Bigg Boss Marathi 5: वर्षा उसगांवकरांमुळे स्पर्धक झोपणार जमिनीवर, निक्की तांबोळीला झाला राग अनावर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi 5: वर्षा उसगांवकरांमुळे स्पर्धक झोपणार जमिनीवर, निक्की तांबोळीला झाला राग अनावर

Bigg Boss Marathi 5: वर्षा उसगांवकरांमुळे स्पर्धक झोपणार जमिनीवर, निक्की तांबोळीला झाला राग अनावर

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 30, 2024 03:21 PM IST

Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात असे काय झाले की सर्व स्पर्धकांना बिग बॉसने जमिनीवर झोपण्याचा आदेश दिले? चला जाणून घेऊया…

Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi 5

'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्या दिवसापासूनच अनेक कमाल गोष्टी घडत आहेत. सदस्यांना अडचणीत आलेलं पाहून 'बिग बॉस'प्रेमींना मात्र मजा येत आहे. 'बिग बॉस'ने सदस्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. सदस्यांचं पाणी बंद केल्यानंतर आणि त्यांना उपाशी ठेवल्यानंतर आता 'बिग बॉस'ने सदस्यांना जमिनीवर आणलं आहे. वर्षा उसगांवकरांमुळे जमिनीवर झोपावं लागणार असल्याने निक्की तांबोळीचा राग अनावर झालेला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

बिग बॉसचा नवा प्रोमो आला समोर

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रमोममध्ये 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या दिवशी काहीही काम नसल्याने वर्षा उसगांवकर झोपल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यासकट घरातील इतर सदस्यांनाही 'बिग बॉस'ने शिक्षा दिलेली आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत की, "घरातील कोणत्याही स्पर्धकाला बेडचा वापर करण्याची परवानगी नाही." 'बिग बॉस'च्या या आदेशानंतर घरातील सर्व सदस्य चिंतेत दिसत आहेत..

निक्की तांबोळीला राग अनावर

वर्षा उसगांवकर या 'बिग बॉस'ची माफी मागतात. "चुकून झाले" असे त्या बोलल्या. त्यावर पारा चढलेली निक्की म्हणते,"आम्हाला भोगावे लागत आहे.. तुमच्यामुळे आता आम्हाला जमिनीवर झोपावे लागणार आहे." यावर वर्षा म्हणतात,"माझ्या एकटीमुळे झालेले नाही." त्यावर निक्की म्हणते,"तुम्ही झोपला होतात तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती." निक्कीला शांत करत वर्षा ताई म्हणतात, "आरडाओरडा करू नको." तरीही निक्की शांत बसत नाही उलट त्यांना प्रतिउत्तर देत त्यांनाच शांत बसण्यास सांगते.
वाचा: 'बिग बॉस मराठी ५'च्या घरातील अंकिता वालावलकरचा बॉयफ्रेंडने केला होता छळ, वाचा खासगी आयुष्याविषयी

'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांना आता बेडचा वापर करता येणार नाही. निक्की आणि वर्षाताईंचा चढलेला पारा 'बिग बॉस' प्रेमींना मनोरंजनाची मेजवानी देणारा ठरेल. तर 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांना जमिनीवर झोप लागेल का? हे पाहण्यासाठी आजचा रंजक भाग प्रेक्षकांना पाहावा लागणार आहे.

Whats_app_banner