‘बिग बॉस मराठी’ चा हा पाचवा सीझन सतत चर्चेत असतो. या सीझनमधील टास्कही चर्चेत असतात. ‘बिग बॉस मराठी’ हा छोट्या पडद्यावरील लयभारी खेळ प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रत्येक आठवड्याला घरात नवा टास्क पार पडत असतो. आताही ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवा खेळ पाहायला मिळणार आहे. या टास्कमध्ये वर्षाताई आणि अंकितामध्ये जबरदस्त खेचाखेची झाली आहे.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस मराठीच्या आजच्या भागाचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये आज घरात लगोरीचा खेळ खेळला जात असल्याचे दिसत आहे. आज खेळल्या जाणाऱ्या लगोरी खेळात अंकिता आणि वर्षा ताईंमध्ये चांगलीच लढत होणार आहे. अंकिता वर्षाताईंना ढकलून देताना दिसते. तसेच ते पाहून निक्की अरे बाप हा कुस्तीचा खेळ नाही असे बोलताना दिसत आहे. वर्षा आणि अंकिता त्यांच्यामध्ये होणारी खेचाखेची प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहे. या रंगतदार टास्कमध्ये कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन आजपासून आणखी रंगतदार होणार आहे. काही दिवसांतच हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने सर्व सदस्यांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. सोशल मीडियावर बिग बॉस मराठी सिझन पाचची बरीच चर्चा सुरु आहे. घरात होणारे टास्क, स्पर्धकांचे मजेशीर वागणे, वाद-विवाद अशा बऱ्याच गोष्टींची कायम चर्चा सुरु असायची. आता बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले लवकरच होणार आहे. नेहमी बिग बॉस मराठी हा शो १०० दिवसांचा असतो. पण यावेळी हा शो ७० दिवसात बंद करणार आहेत. म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले होणार आहे.
वाचा: अशी मी मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी; 'फुलवंती'मधील पहिल्या गाण्याने लावले प्रेक्षकांना वेड
बिग बॉस मराठीच्या घरात आता सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, वर्षा उसगावकर, पाडूरंग कांबळे, निक्की तांबोळी, अभिजित सावंत, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक दिसत आहेत. या पैकी कोणाच्या हातात आता ट्रॉफी असणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.