Bigg boss Marathi 5: छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाचा सिझन हा सर्वांसाठी अतिशय वेगळा ठरला आहे. या सिझनचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करत आहे. त्यासोबतच शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमध्ये कलाकारांसोबतच इन्फ्लूएंसर देखील दिसत आहेत. त्यात रिल स्टार सूरज चव्हाणचा देखील सहभाग आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात सूरजला सतत टार्गेट केले जात आहे. त्याला त्याचे निर्णय घेता येत नाहीत, त्याला कोणतेच काम जमत नाही, तो घरात मिक्स होत नाही असे अनेक आरोप त्याच्यावर लावले जात आहेत. पण सूरज कोणालाही काही न बोलता चूपचाप सगळं ऐकून घेताना दिसत आहे. आता सूरजला बिग बॉसने बोलावले आहे आणि कोणालाही न घाबरता खेळ खेळण्यास सांगितला आहे. तेव्हा कुठे जाऊन सूरजचा आत्मविश्वास वाढला आहे.
दरम्यान, सूरजला पाठिंबा देण्यासाठी एक मराठमोळा कलाकार पुढे आला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सूरजला पाठिंबा दिला आहे. हा अभिनेता दुसरातिसरा कोणी नसून उत्कर्ष शिंदे आहे. उत्कर्षने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला “सूरज तू मोठ-मोठ्या संकटांना हरवून आज इथपर्यंत आला आहेस. तू सच्चा आहेस यांच्या सारखा चेहरे बदलणारा नाहीस. या शिकलेल्या माणसांना ‘माणसाने माणसाशी माणसासारखे’ वागावे हे एवढंही आठवत नसेल तर यांचं शिक्षण चुलीत घाला” असे म्हणत पोस्ट शेअर केली आहे.
सूरज चव्हाणबद्दल ही पोस्ट शेअर करून उत्कर्षने याच्या खाली नुकत्याच प्रदर्शित झालेला बिग बॉसचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये निक्की सूरजला मी तुला माझे खरे रुप दाखवेन असे बोलताना दिसत आहे. या प्रोमोवर देखील उत्कर्षने “तुम सिर्फ डरा सक्ते हो हरा नहीं सकतें” अशी कमेंट केली आहे.
वाचा: 'कॅमेरासमोर जाईल की महाराष्ट्राचा छोटा पुढारी गुदगुल्या करतो', कोल्हापूरच्या गड्यावर संतापला घनःश्याम
सूरज चव्हाणने 'टिक टॉक'च्या पहिल्या दहात स्थान मिळवले होते. त्याचा गुलिगत हा डायलॉग तुफान चर्चेत असायचा. त्याला बिग बॉसच्या घरात पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. सूरजचे आता इन्स्टाग्राम अकाऊंटवर ९ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो मूळचा बारामतीचा आहे.