Bigg Boss Marathi 5 Latest update: ‘बिग बॉस मराठी ५’ या रिअॅलिटी शोमध्ये आज आठवड्यात धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. कारण आज बिग बॉस मराठीच्या घरात ‘भाऊचा धक्का’ हा विशेष भाग पार पडणार आहे. या भागात होस्ट रितेश देशमुखने अनेकांना फटकारणार आहे. सतत आरेरावीची भाषा करणाऱ्या निक्की तांबोळीला बिग बॉस मराठीच्या घरात आज रितेश चांगलेच सुनावणार आहे. त्याने निक्कीला थेट तुमचा मेंदू हलका आहे असे म्हटले आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घराची चौथ्या आठवड्याची निक्की कॅप्टन झाली आहे. खरंतर हे कॅप्टनसीपद निक्कीकडे अरबाजमुळे आले. निक्कीने अरबाजकडे वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून कॅप्टनसी मागितली होती. त्यामुळे त्याने त्याने वेळ येताच निक्कीला कॅप्टनसी दिली आहे. पण कॅप्टन पद मिळाल्यानंतर निक्कीचे एक वेगळच रूप पाहायला मिळत आहे. निक्कीने कॅप्टनसीचा चुकीचा वापर केला. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेशने कॅप्टन निक्कीची चांगलीच शाळा घेतली आहे.
भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख निक्कीला चांगलेच सुनावताना दिसणार आहे. रितेश भाऊ म्हणतोय, "निक्की तुम्ही हलक्या कानाचे आहात आणि तुमची बुद्धीदेखील हलकीच आहे. तुम्हाला ना या घरातले चावी मारतात... मी रितेश देशमुख आहे मला हलक्यात घेऊ नका." आता त्यावर निक्की काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
वाचा: मैत्रीणच मैत्रिणीवर उलटली! निक्की निक्की करणाऱ्या जान्हवी किल्लेकरचा सूर अचानक बदलला!
'बिग बॉस मराठी'चा हा गेम डोक्याने खेळण्याचा आहे. रितेश भाऊ दर आठवड्याला सदस्यांची हजेरी घेताना दिसून येतो. या आठवड्यातही तो सदस्यांची चांगलीच शाळा घेताना दिसून येणार आहे. त्याने निक्कीला यापूर्वीही चांगलेच सुनावले होते. यापूर्वी निक्कीने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा अनेकदा अपमान केला होता. तसेच तिने त्यांच्या मातृत्वावर देखील टिपणी केली होती. ते पाहून रितेश संतापला होता. आता पुन्हा एकदा रितेशने निक्कीला चांगलेच सुनावले आहे.
आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी डोंबिवलीची मराठी मुलगी निक्की तांबोळी हिंदी बिग बॉसमध्ये अनेकांना टक्कर देत टॉप थ्री मध्ये पोहोचली होती. बोल्ड, बिनधास्त आणि सुंदर असलेल्या निक्कीने आयुष्यातील तिचे नियम स्वत:च ठरवले आहेत. पण बिग बॉसच्या घरातील तिचे वागणे पाहून सर्वजण वैतागले आहेत.