'बिग बॉस मराठी'चा ५वा सिझने दोन वर्षांनंतर अखेर सुरु झाला आहे. अल्पावधीतच या सिझनचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे. दररोज बिग बॉसच्या घरात काही तरी नवे सरप्राईज पाहायला मिळत आहेत. तसेच एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता अशा सर्व गोष्टी यंदाच्या सीझनमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्य एकमेकांसोबत चांगलेच भिडताना दिसत आहेत. आता आजच्या एपिसोडमध्ये तर घरातील दोन स्पर्धकांमध्ये चक्क मारामारी झाल्याचे दिसत आहे.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बिग बॉस मराठी'चा एक नवा धमाकेदार प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये या प्रोमोमध्ये जान्हवी आणि आर्या एकमेकींसोबत नडताना दिसून येत आहे. जान्हवी-आर्यामध्ये धक्काबुक्की झालेलीदेखील पाहायला मिळत आहे. तसेच जान्हवीने आर्यावर हात देखील उचल्याचे दिसत आहे. जान्हवी आणि आर्याचे भांडण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.
प्रोमोमध्ये जान्हवी म्हणते,"नॉमिनेशनदरम्यान आर्या किती फडफड करत होती." त्यावर आर्या म्हणते,"माझ्यामध्ये तुम्ही आता येऊ नका." तर जान्हवी आर्याला म्हणते,"किती दिवस 'बिग बॉस मराठी'च्या घरात राहतेस ना तेच बघते मी." त्यानंतर दोघींमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायल मिळत आहे. आर्या आणि जान्हवीचा प्रोमोमधील पंगा पाहून 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात काय घडतंय हे बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे.
बिग बॉस मराठी ५च्या घरात पहिल्यांदाच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण आणि पुरुषोत्तमदादा पाटील हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. त्यामधील कोणत्या स्पर्धकाचा प्रवास आज संपणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा : 'तुम सब उसको डरा सकते हो, हरा नहीं सकते', उत्कर्ष शिंदेचा गोलिगत सूरज चव्हाणला पाठिंबा
बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन हा कलर्स मराठी वाहिनीवर रात्री ९ वाजता दाखवण्यात येत आहे. त्यासोबतच जिओ सिनेमा या अॅपवर देखील तुम्ही रात्री ९ वाजता हा सिझन लाइव्ह पाहू शकता.
संबंधित बातम्या