गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला बिग बॉस मराठी सिझन ५ हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरातान दिसत आहे. यंदाचा सिझन हा नेमही पेक्षा वेगळा असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रत्येक भागाची उत्सुकता पाहायला मिळते. रविवारी बिग बॉसच्या घरातून मठाधीपती पुरुषोत्तम हे बाहेर पडले. त्यानंतर आता कोणते स्पर्धक नॉमिनेट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच बिग बॉसच्या घरात नॉमिनेश टास्क दरम्यान अभिजीत सावंत अन् छोटा पुढारी यांच्यामध्ये चांगलेच भांडण झाले आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात आज दुसरे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. या नॉमिनेशन कार्यात कोण नॉमिनेट होणार आणि कोण सेफ होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या नॉमिनेशन कार्यात अभिजीत सावंत आणि छोटा पुढारी एकमेकांसोबत भिडताना दिसणार आहेत. अभिजित घन:शामला चांगलेच सुनावताना दिसत आहे. तसेच नॉमिनेट झालेल्या कोणत्या सदस्याला बिग बॉस सेफ करणार हे पाहावे लागेल.
कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पॅडी-योगिता, निखिल-सूरज, वर्षा-जान्हवी, अरबाज-धनंजय, वैभव-इरिना, आर्या-अभिषेक, वर्षा-घन:श्याम अशा जोड्या बनलेल्या दिसत आहेत. घरातील सदस्यांनी अंडी, कांदा-बटाटा अशा अनेक गोष्टी कॉम्प्रोमाइज केलेल्या आहेत. दरम्यान अभिजीत सावंत आणि छोटा पुढारी एकमेकांसोबत भिडताना दिसणार आहेत. पण त्या दोघांचे भांडण नेमके कशावरुन झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बिग बॉस मराठी ५च्या घरात गायक अभिजित सावंत ज्या प्रकारे खेळ खेळत आहे ते सर्वांनाच आवडत आहे. एखादा टास्क परफॉर्म करताना अभिजित १०० टक्के देताना दिसत आहे. पण छोटा पुढारी म्हणून ओळखला जाणारा घन:शाम मात्र उगाचच कोणतेही मुद्दे घेऊन बोलत असल्याचे दिसत आहे. तसेच तो प्रत्येक नॉमिनेशनमध्ये फार वेगळा विचार देखील करत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
वाचा: 'मला महाराष्ट्राचे राजकारण तुझ्यात दिसतंय', अंकिता वालावलकरचा छोट्या पुढारीला टोला
अंडी, बटाटा आणि कांदे अशा अनेक गोष्टी 'बिग बॉस मराठी'च्या सदस्यांनी नॉमिनेट केल्याने घरात जेवण बनवायचे वांदे होणार आहेत. तेव्हा ते नेमकी काय शक्कल लढवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आता आतूर आहेत. सदस्यांचे झालेले वांदे पाहायला प्रेक्षकांना मात्र मजा येणार आहे.