'बिग बॉस मराठी'चा ५वा सिझने दोन वर्षांनंतर अखेर सुरु झाला आहे. अल्पावधीतच या सिझनचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे. दररोज बिग बॉसच्या घरात काही तरी नवे सरप्राईज पाहायला मिळत आहेत. तसेच एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता अशा सर्व गोष्टी यंदाच्या सीझनमध्ये पाहायला मिळत आहेत. घरातील स्पर्धक निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यामधील भांडणे तर चर्चेचा विषय ठरत आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात निक्की तांबोळी वारंवार 'बाई बाई' बोलताना दिसून येत आहे. निक्कीचा हा अंदाज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे.
पण वर्षा उसगावकर यांना मात्र निक्कीचा हा अंदाज फारसा आवडत नाहीये. त्या सतत निक्कीला तिच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.