छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ सध्या चर्चेत आहे. हा शो महाअंतिम सोहळ्याच्या टप्प्याच पोहोचला आहे. त्यापूर्वी बिग बॉस मराठीच्या घरात बहुप्रतिक्षीत ‘फॅमिली वीक’ टास्क सुरू झालेला दिसत आहे. ‘बिग बॉस’मध्ये ‘फॅमिली वीक’ सुरू झाल्याचे पाहून प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यामुळे आता कुटुंबीय येऊन घरातील सदस्यांना काय सल्ला देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरत आहे. दरम्यान, निक्कीची आई घरात येताच तिने अरबाजचे सत्य सांगितले आहे. आता घरात काय नवा राडा होणार चला जाणून घेऊया...
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस मराठी सिझन ५च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आजच्या भागात निक्की तांबोळीची आई घरात आल्याचे पाहायला मिळाले. निक्कीची आई घरातच येताच बोलताना दिसते की, 'अरबाज चुकीचा चालला आहे. त्याने असं नाही करायला पाहिजे. त्याचा साखरपुडा झालेला आहे.' त्यावर निक्कीला धक्का बसतो. ती विचारते कोणाचा, 'साखरपुडा?' त्यावर निक्कीची आई सांगते, 'अरबाजचा साखरपुडा झालेला आहे.'
व्हिडीओमध्ये निक्की अतिशय चिडलेली दिसत आहे. ती म्हणते, 'आता मी सांगते बिग बॉस आता जर तो आला तर मी मेंटली पागल होईल. हे अरबाज निक्की जे होतं ना ते आता संपलं आहे.' त्यानंतर निक्की अरबाजचे सगळे कपडे आणि मग गोळा करते. ते स्टोअर रुममध्ये जाऊन ठेवते. तसेच बिग बॉसला ते फेकून देण्यास सांगते. निक्कीला अरबाजचे सत्य कळताच धक्का बसतो. ती खूप दुखावली गेल्याचे पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर बिग बॉस मराठी ५चा हा प्रोमो व्हायरल होताच अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने ‘बाई काय हा प्रकार असे आता निक्की बोलेले’ अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने ‘बरं झालं निक्कीला कळाले ते’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘तरी सुरज सांगत होता गुलीगत धोका… बुक्कीत टेंगुळ’ असे म्हटले आहे.
वाचा: 'सासरचं धोतर' सिनेमामुळे दादा कोंडके यांचे पुतण्यासोबत झाले होते वाद, वाचा काय आहे प्रकरण?
बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सुरु झाल्यापासूनच अरबाज आणि निक्की यांची चांगलीच चर्चा रंगली होती. त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण होत असल्याचे दिसत होते. अरबाज देखील निक्कीच्या प्रेमात असल्याचे दिसत होते. पण आता अरबाजचा साखरपुडा झाल्याची माहिती आईने देताच निक्कीला मोठा धक्का बसला आहे. आता शोच्या आगामी भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.