'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या स्पर्धकांचा खेळ पाहण्यास मजा येत आहे. नुकताच घरातील सदस्यांनी नॉमिनेशन टास्कदरम्यान आवश्यक किराणा सामान विकत घेतले. या टास्कदरम्यान पॅडी, योगिता, सूरज, निखिल, निक्की आणि घन:श्याम हे घरातील सदस्य नॉमिनेट झाले. नॉमिनेट झाल्याने निक्कीचा राग अनावर झालेला पाहायला मिळाला. तिने रागाच्या भरात अरबाजला खूप काही सुनावले. योगिता आणि वैभव निक्कीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण ती कोणाचे ऐकेल तर निक्की कसली.
कलर्स मराठी वाहिनीने नुकताच सोशल मीडियावर 'बिग बॉस मराठी'च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अरबाजमुळे निक्की प्रचंड दुखावलेली दिसत आहे. वैभव आणि जान्हवी निक्कीला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दरम्यान "तुला वाचवण्यासाठीच अरबाज प्रयत्न करत होता", असे वैभव निक्कीला म्हणत आहे. त्यावर निक्की म्हणते, "ते गेलं खड्ड्यात... एवढं प्रेम दाखवून देखील मी नॉमिनेट झाली आहे." आता लसणाच्या ठेच्यासारखा निक्कीचा राग अरबाज पचवू शकेल का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
सोशल मीडियावर बिग बॉसचा हा प्रोमो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'तुला प्रेम नाही दाखवत ग येडे गबाळे तो तुला वेडी बनवत आहे आणि स्वतः गेम खेळत आहे ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'आता तर सुरुवात आहे निक्की. तुला अजून बरच काही पाहायचं आहे' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने निक्कीला थेट घराबाहेर जाण्याचा सल्ला दिला आहे. 'ए बाई तू जा ना घरा बाहेर... शांतता राहील घरामध्ये आणि जाताना तुझी चमची आहे ना तिला पण घेऊन जा' अशी कमेंट केली आहे.
वाचा: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्यानंतर सामंथा रुथ प्रभूने केली पहिली पोस्ट, म्हणाली...
निक्कीचे भांडण एकीकडे सुरु असते. तर दुसरीकडे घरातील इतर स्पर्धक धमाल करताना दिसत आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात पॅडीने अभिजीतची नक्कल केली आहे. अभिजीतची नक्कल करत पॅडी म्हणतोय,"हे बघा मित्रांनो.. आपण आज इथे आलो आहोत तर आपल्याला टिकून राहणं खूप गरजेचं आहे. गाणं ऐकून तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. शक्ती आहे तर आपल्याकडे युक्ती आहे."