Bigg Boss Marathi 5 Day 24: छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सध्या चर्चेत आहे. या शोने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. स्पर्धकांचा या घरातील चौथा आठवडा दणक्यात सुरु आहे. तीन आठवड्यात घरात दोन गट झाले असून दोन्ही गटांची उत्तम खेळी 'बिग बॉस'प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. तीन आठवड्यातच घरातील सदस्यांमध्ये मैत्रीचं आणि बहिण भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. आजच्या भागात अभिजीतमुळे अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत फूट पडलेली पाहायला मिळणार आहे.
कलर्स मराठी वाहिनीने नुकताच बिग बॉस मराठीच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये निक्की आणि घन:श्याममध्ये कल्ला झालेला पाहायला मिळाला. या प्रोमोमध्ये अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत फूट पडलेली दिसून येत आहे. प्रोमोमध्ये निक्की अभिजीतला विचारत आहे की, "तुला वाटतं का की मी मनापासून माफी मागत नाही." त्यावर अभिजीत लगेच उत्तर देतो, "हा तू मनापासून माफी मागते." निक्की अभिजीतसोबत बोलल्याने अरबाजचा राग अनावर झाला आहे.
प्रोमोमध्ये दिसत आहे निक्की अभिजीतशी बोलायला गेल्यामुळे अरबाजला राग अनावर होतो. तो निक्कीला तू भवऱ्यासारखी फिरते असे बोलतो. ते ऐकून निक्कीला देखील राग अनावर होतो. निक्की चिडते आणि अरबाजला लांब करते. अरबाज देखील प्रचंड चिडतो. आता अभिजीतमुळे निक्की-अभिजीत एकमेकांपासून दूरावणार का? याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात कधी कोणामध्ये वाद होईल हे सांगू शकत नाही. दोन सख्खे मित्र कधी वैरी होतील हे सांगता येत नाही. 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागातही प्रेक्षकांना हेच चित्र पाहायला मिळेल.
वाचा: रक्षाबंधनाच्या दिवशी भावा बहिणीच्या नात्यात पडली फूट; निक्की अन् छोटा पुढारीमध्ये मोठा वाद
यापूर्वीही अभिजीतमुळे निक्की आणि अरबाजमध्ये भांडण झाले होते. अरबाजला निक्कीने अभिजीतशी बोलू नये असे वाटते. पण निक्की कोणाचेही ऐकत नाही. ती तिला हवे तसेच वागत असते. आज घरता सत्याचा पंचनामा हा टास्क सुरु आहे. या टास्कमध्ये देखील निक्की आणि वैभवचे भांडण होणार आहे. सत्याचा पंचनामामध्ये सदस्य काय धमाका करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. तसेच या आठवड्यात कोणते सदस्य नॉमिनेट होणार हेदेखील लवकरच समोर येईल.