'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची थाटात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड प्रीमियरला निक्की तांबोळी रितेश भाऊसमोरच स्प्लिट्सविलाची जान असलेल्या अरबाज पटेलवर फिदा झालेली दिसून आली. आता दुसऱ्या दिवशी छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे निक्की आणि अरबाज यांना ग्रीन सिग्नल देताना दिसून येणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या दिवसाचा प्रोमो समोर आला असून दुसऱ्याच दिवशी घरातील सदस्य रोमँटिक अंदाजात दिसून येत आहेत. प्रोमोमध्ये निक्की तांबोळी चहा बनवायला घेते. पण हीटर चालत नसल्याने ती छोटा पुढारीला 'बिग बॉस'ला विनंती करण्यास सांगते. त्यावेळी छोटा पुढारी म्हणतो, "बिग बॉस' आमच्या वहिनींचे तरी ऐका..." त्यावर अरबाज त्याला म्हणतो, "थांबरे सकाळी सकाळी असे काय म्हणतो तू.." पुढे छोटा पुढारी म्हणतो, "तुझं प्रेम उतू चाललंय ते सांगतोय.. चहा उतू गेला तर काही बिघडत नाही." छोटा पुढारीच्या या वक्तव्यावर अरबाज आणि निक्कीला हसू अनावर होतं.. अरबाज तर डोक्यालाच हात लावतो. त्यानंतरही छोटा पुढारी पुढे म्हणतो, "प्रेमात असचं असतंय 'बिग बॉस.' छोटा पुढारीमुळे 'बिग बॉस मराठी'च्या घरात हास्य कल्लोळ होतो.
'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड प्रीमियरला निक्की तांबोळी अरबाजकडे पाहून लाजताना दिसली होती. अरबाजला पाहून सगळंच विसरली असल्याचं ती म्हणाली होती. रितेश भाऊलाही निक्की थोडं थोडं काहीतरी होऊ शकतं असं म्हणाली होती. तर दुसरीकडे अरबाजही, निक्कीला आता सगळीकडे मीच दिसेन, माझ्याशिवाय तिला दुसरं काही सुचणार नाही, असं म्हणाला होता". त्यामुळे आता 'बिग बॉस मराठी'च्या या सीझनमध्ये निक्की आणि अरबाजची जोडी जमणार का? याकडे 'बिग बॉस'प्रेमींचं लक्ष लागलं आहे.
वाचा: 'बिग बॉस मराठी ५'च्या घरातील अंकिता वालावलकरचा बॉयफ्रेंडने केला होता छळ, वाचा खासगी आयुष्याविषयी
बिग बॉस मराठी ५मध्ये वर्षा उसगावकर, अभिजीत सावंत, निक्की तंबोळी, पॅडी कांबळे, अंकिता वालावलकर, निखील, योगिता चव्हाण, जान्हवी किलेकर, घनःश्याम दरवडे, इरिना रुडिकोवा, वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल, आर्या जाधव,पुरुषोत्तमदादा पाटील, धनंजय पोवार आणि सूरज चव्हाण हे स्पर्धक दिसत आहेत.
संबंधित बातम्या