Bigg Boss Marathi 5 Update: छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांसाठी चाहते सध्या नवस करताना दिसत आहेत. आज या घरातील सदस्यांना खास सरप्राईज मिळणार आहे. 'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग खूपच विशेष ठरणार आहे. आज 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाची संपूर्ण टीम म्हणजेच स्वप्नील जोशी, सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक सराफ घरात जाणार आहेत. घरातील स्पर्धकांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या घरात वर्षा ताई आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्यात डान्सची जुगलबंदी रंगणार आहे. ती पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
नुकताच कलर्स मराठी वाहिनीने 'बिग बॉस मराठी'च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये डॉ. निलेश साबळे सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. निलेश साबळे म्हणतो, "सुप्रिया ताई तुमचे गाणे लागेल की वर्षा ताईंनी परफॉर्म करायचे आणि त्यांचे गाणे लागले की तुम्ही परफॉर्म करायचे.' त्यानंतर सुप्रिया ताई आणि वर्षा ताई 'घे पाऊल पुढे जरा' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. पुढे डॉ. निलेश साबळे म्हणतो, "वर्षा ताईंचे गाणे लागेल तेव्हा सुप्रिया ताई डान्स करणार." त्यानंतर "मी आले", या गाण्यावर त्या थिरकताना दिसत आहेत.
सध्या सोशल मीडियावर वर्षा आणि सुप्रिया या दोघींच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यांच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. कलाकारांनी देखील कमेंट करत दोघींचे कौतुक केले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'निक्कीला म्हणा यांना तरी ओळखते का?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. आजच्या भागाचा हा प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
सुप्रिया ताई आणि वर्षा ताईंचा डान्स प्रेक्षकांना आवडेलच. पुढे डॉ. निलेश साबळे लाडक्या अशोक मामांना प्रश्न विचारताना दिसत आहे. "तुमच्या घरी 'बिग बॉस कोण आहे?" याचे उत्तर देत मामा म्हणतात, "निवेदिता ताई... माझ्या मर्मावर बोट ठेवलंस." ते ऐकून सर्वांनाच हसू अनावर होते.
वाचा: ७० दिवसातच ‘बिग बॉस मराठी ५’ घेणार प्रेक्षकांचा निरोप? 'या' दिवशी होणार फिनाले
बिग बॉस मराठीच्या घरात नुकताच नॉमिनेश टास्क पार पडला. या टास्कमध्ये वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक नॉमिनेट झाले. आता भाऊच्या धक्क्यावर कोणता स्पर्धक बाहेर पडणार हे लवकरच कळेल.