Bigg Boss Marathi 5 : छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ हा रिअॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. यंदाचा पाचवा सिझन सर्वांचे लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरातील स्पर्धक आर्या जाधवला निक्कीवर हात उचला. त्यामुळे आर्याला घराबाहेर जावे लागले. कॅप्टन्सी कार्यामध्ये आर्याने संयम सोडून निक्कीवर हिंसेचा प्रयोग केल्यामुळे शोचा सूत्रसंचालक रितेश देशमुखने चांगलेच सुनावले. आता निक्कीच्या आईने आर्यावर अनेक आरोप केले होते. त्यावर आर्याने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धक आर्याने निक्कीला मारल्यावर नेटकऱ्यांनी कौतुक केले. पण हे बिग बॉसच्या नियमांच्या विरोधात असल्यामुळे तिला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यावर निक्कीच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे. “आर्याने निक्कीला शारीरिक इजा केली आणि ही गोष्ट निंदनीय आहे. ‘बिग बॉस’ने यांची गंभीर दाखल घ्यायला हवी. आम्हाला आमच्या मुलीची काळजी वाटत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात तिच्याबरोबर रोजचे असे काहीतरी घडत आहे” असे निक्कीची आई म्हणाली.
पुढे त्यांनी बिग बॉसला थेट जाब विचारत म्हटले की, “आमची मुलगी ‘बिग बॉस’च्या घरात मार खायला गेली आहे का? ‘बिग बॉस’ ला माझी हात जोडून विनंती आहे की, माझ्या मुलीला शारीरिक संरक्षण मिळाले पाहिजे.”
वाचा: इंटिमेट सीनसाठी दारू पाजली अन् बलात्कार केला; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
निक्कीच्या आईने प्रतिक्रिया देताच आर्याने प्रतिक्रिया दिली आहे. तिने निक्कीच्या आईला चांगलेच सुनावले आहे. “निक्कीची आई म्हणते माझी मुलगी इथे मार खायला आली आहे का? त्यांना मी सांगू इच्छिते की, काकू इतर मुलीही इथे मार खायला आल्या नाहीत. आम्हीही तिथे मार खायला गेलो नव्हतो. तिनेही मला धक्काबुक्कीमध्ये कानाखाली मारली. त्यावर माझी ती कानाखाली मारण्याची प्रतिक्रिया निघाली. मला जेव्हा बोलले घराबाहेर जा तेव्हा मी काहीच नाही बोलले. मला घरामध्ये ठेवा असंही नाही बोलले. कारण त्यांचा अनादर झाला असता. मी हात उचलणं पण चुकीचंच होतं. पण याचा अर्थ असा नाही की निक्की बरोबर आहे. आतापर्यंत तिनेही हात उचलला. तिथे कोण कोण हिंसा करत हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे. अजूनही माझ्या अंगावर खुणा आहेत” असे म्हटले आहे.
संबंधित बातम्या