Bigg Boss Marathi 5 Update: 'बिग बॉस मराठी' हा रिअॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पण आठवड्याच्या शेवटी या शोमध्ये स्पर्धकांनी केलेल्या चुका दाखवण्यासाठी शोचा सूत्रसंचालक रितेश देशमुख हजर होतो. त्यावेळी रितेशने स्पर्धकांसोबत फ्रेंडशिप डे देखील साजरा केला. पण यावेळी छोटा पुढारी घन:श्याम आणि अंकिता यांच्यामध्ये चांगला वाद होता. आता त्या दोघांनी बसून हा वाद सोडवला आहे.
रितेशने फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने काही लॉकेट स्पर्धकांसमोर ठेवले होते. हे लॉकेट प्रत्येक स्पर्धकाने घरातील इतर सदस्याला द्यायचे होते. तेव्हा अंकिता वालावलकरने हे 'डबल ढोलकी' असे लिहिलेले लॉकेट घन:शामच्या गळ्यात घातले. तेव्हा त्याला प्रचंड राग आला होता. त्याने अंकिताला हिच स्वत: विचारात असते असे म्हटले. अंकिताला खासगी गोष्टी अशा सर्वांसमोर बोलल्यामुळे राग आला होता. त्यामुळे नॉमिनेशनच्या दुसऱ्या दिवशी छोटा पुढारी अंकिताशी बोलायला येतो.
अंकिताने घन:शामला सांगितले की तो चुकीचा वागला. अंकिता एकटी बसून विचार करत असते, तिला एकटं बसायला आवडत असताना देखील त्याने सर्वांसमोर हिच स्वत: विचारात असते हे म्हणणे चुकीचे होते. अंकिता घन:शामला समजावण्याचा प्रयत्न करते की तू अशा खासगी गोष्टी टास्कच्या वेळी काढत जाऊ नकोस. टास्कच्या वेळी टास्क असतो आणि घरातील आपले नाते हे वेगळे असते. टास्क झाल्यानंतर ते तेथेच सोडून द्यायचे असते. तरी सुद्धा घन:शाम ऐकायला तयार नसतो. शेवटी अंकिताला त्याला बोलते की, 'मला महाराष्ट्राचे राजकारण तुझ्यात दिसतय, मला माफ कर, मी तुला साष्टांग नमस्कार घालते.' त्यावर घन:शाम बोलतो की असं काही करु नकोस. घरात कॅमेरे आहेत.
वाचा : कतरिना कैफने रात्री 2 वाजता आलिया भट्टला मेसेज करून का मागितली मदत? वाचा काय झालं
बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात पहिला कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये घरातील स्पर्धक काय राडा घालणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तसेच अंकिता, निक्की, अरबाज, जान्हवी, वैभव, आर्या, अभिजित, पॅडी या स्पर्धकांपैकी कोण कॅप्टन बनणार हे देखील पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. त्यासाठी प्रेक्षकांना आज रात्री ९ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस हा शो पाहावा लागणार आहे.