Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’च्या घरात अभिजित सावंतला झाली दुखापत, पाहा व्हिडीओ-bigg boss marathi 5 update abhijit sawant get injured ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’च्या घरात अभिजित सावंतला झाली दुखापत, पाहा व्हिडीओ

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’च्या घरात अभिजित सावंतला झाली दुखापत, पाहा व्हिडीओ

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 14, 2024 06:42 PM IST

Bigg Boss Marathi Update : बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये गायक अभिजित सावंतला दुखापत झाल्याचे दिसत आहे. पाहा व्हिडीओ

abhijit sawant get injured
abhijit sawant get injured

Bigg Boss Marathi Day 18: छोट्या पडद्यावरील इतर मालिकांप्रमाणेच रिअॅलिटी शो हे चर्चेत असतात. सध्या कलर्स मराठी वाहिनीवर सुरु असलेला बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. दोन वर्षांनंतर सुरु झालेल्या या रिअॅलिटी शोमध्ये नॉमिनेशन टास्क आणि कॅप्टनसी टास्क सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आज घरात एक भन्नाट कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. नव्या आठवड्यातील नव्या टास्कदरम्यान घरातील सदस्य चांगलाच कल्ला करताना दिसणार आहे. दरम्यान, या टास्कमध्ये अभिजित सावंतला दुखापत झाल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे.

अभिजित सावंतला झाली दुखापत

'बिग बॉस मराठी'च्या घरात आज 'बोटीत बसून घराचा कॅप्टन कोण बनणार' हा कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये सदस्यांना बोटीत बसून बोट सांभाळायची आहे. त्यासोबतच कॅप्टनपदाचे उमेदवार बाजूला करायचे आहेत. या कार्यादरम्यान, अभिजित सावंतला चांगलीच दुखापत झाल्याचे समोर आले आहे. कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या कॅप्टनसी टास्कचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये अभिजितला दुखापत झाल्याचे दिसत आहे. दुखापत झाल्यानंतर तो ओरडताना आणि रडताना दिसत आहे. आता अभिजितला किती दुखापत झाली आहे हे आजच्या भागात कळणार आहे. पाहा व्हिडीओ…

काय घडणार आजच्या भागात?

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात निक्की आणि जान्हवी त्यांना वाटत असलेल्या घरातील कच्चा लिंबूबद्दल भाष्य करताना दिसत आहेत. निक्कीसाठी 'बिग बॉस मराठी'च्या घरातील कच्चा लिंबू रॅपर आर्या जाधव आहे. निक्कीने आर्याचं नाव घेत बिग बॉसलादेखील याबद्दल सांगितलं आहे.
वाचा : तुमचा मुलगा काही करू शकत नाही, त्याची उंची नाही; 'बिग बॉस मराठी ५'च्या घरात छोटा पुढारी रडला!

बाळ सांभाळण्याच्या टास्कमध्ये निक्कीने ओलांडल्या मर्यादा!

यापूर्वी घरात देण्यात आलेल्या बाळ सांभाळण्याच्या टास्कमध्ये निक्कीने पुन्हा एकदा वर्षा उसगांवकर यांचा अपमान केला. तिने त्यांना थेट मुलबाळ नसण्यावरून टोमणा मारला आहे. या घरात आल्यावर बोलण्याच्या ओघात वर्षा उसगांवकर यांनी आपल्याला मुलबाळ नसल्याची गोष्ट सगळ्यांसोबत शेअर केली होती. तर, या घरात बाळ सांभाळण्याचा टास्क मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसला होता. त्यांनी हा टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निक्की तांबोळी हिच्या बेशिस्त वागणुकीमुळे त्यांच्याकडील बाहुल्याचे पाय फाडले गेले.

विभाग