Bigg Boss Marathi Day 49 : 'बिग बॉस मराठी'चा लयभारी खेळ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहे. बिग बॉसच्या घरातला प्रवास असो किंवा आयुष्यातला संयम हा खूप महत्त्वाचा असतो. एकदा संयम सूटला की खेळ संपला. या आठवड्यात आर्याचा संयम सूटलेला पाहायला मिळाला. तिच्याकडून एक खूप मोठा नियम ब्रेक झाला. त्यामुळे बिग बॉसने त्यांना जेलमध्ये जाण्याची शिक्षा सुनावली आहे. परंतु त्या घटनेचा निर्णय आज होणार आहे.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस मराठीच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आर्याला रितेश भाऊ आज जाब विचारताना दिसून येईल. प्रोमोमध्ये रितेश भाऊने आर्याला जेलमधून बाहेर काढत विचारतोय, "तुम्ही स्वत:ला काय समजता? तुम्हाला राग आला की कोणावरही हात उचलणार? आर्या तुम्ही जे केलं ते 100% इंटेशन्ल होते. मी बिग बॉसला रिक्वेस्ट करतो त्यांनी आपला निर्णय सांगावा." आता बिग बॉस आर्याला घराबाहेर काढणार का? काय असणार बिग बॉसचा निर्णय हे जाणून घेण्याची सर्वां नाच उत्सुकता आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात या आठवड्यात अग्रेशनच्या सगळ्या सीमा पार करण्यात आल्या. धक्काबुक्कीत आर्याला निक्कीची हात लागला. त्यानंतर आर्याचा संयम सुटला आणि आता मारेल असं म्हणत तिने निक्कीच्या कानशिलात लगावली. आर्याने बिग बॉसच्या मुलभूत नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आता तिला काय शिक्षा मिळणार हे पाहावे लागेल. सर्वजण आजच्या भागाची वाट पाहात आहेत.
वाचा: म्हणून मी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणं बंद केलं; अभिनेत्रीनं सगळंच सांगून टाकलं!
बिग बॉसने कॅप्टन्सी टास्क म्हणून एक नवीन खेळ या घरातल्यांना दिला आहे. कॅप्टन्सीसाठीच्या या टास्कमध्ये स्पर्धकांना दिलेल्या डायमंडचे संरक्षण करायचे आहे. यावेळी आर्या जान्हवीला मदत करताना दिसत होती. बाथरुम भागात असलेला डायमंड वाचवण्यासाठी आर्या जान्हवीला मदत करते. आर्या थेट बाथ रुमचे दार बंद करते. निक्का अरबाजची मदत घेऊन त्या भागात जाण्याचा प्रयत्न करत असते. दोघींमध्ये चांगलीच झटापटी होते. पण आर्या नकळत निक्कीच्या कानाखाली आवाज काढते. आता यावर बिग बॉस काय शिक्षा देणार हे आजच्या भागात पाहायला मिळणार.