Bigg Boss Marathi 5 Top 5 Elimination : ‘बिग बॉस मराठी ५’च्या ग्रँड फिनालेमधून आता आणखी दोन स्पर्धकांचा प्रवास संपला आहे. ‘कोकणहार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू वालावलकर आणि धनंजय पोवार यांचं एलिमिनेशन झालं आहे. या दोन्ही स्पर्धकांचा प्रवास विजेतेपदापर्यंत येऊन संपला आहे. ट्रॉफी मिळवण्याची दोघांचीही संधी थोडक्यात हुकली आहे. मात्र, ७० दिवस या घरात टिकून राहण्याची किमया या स्पर्धकांनी करून दाखवली आहे. ग्रँड फिनालेच्या टॉप ५मध्ये पोहोचलेल्या अंकिता प्रभू वालावलकर आणि धनंजय पोवार यांचा प्रवास संपला.
जान्हवी किल्लेकर हिने पैशांची बॅग घेऊन घर सोडल्यानंतर या घरात अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळी हे ‘टॉप ५’ स्पर्धक उरले होते. यानंतर पुन्हा एकदा या खेळात ट्वीस्ट आला आणि एक एलिमिनेशन पार पडलं. यासाठी बिग बॉसने एक खास टास्क दिला होता. यामध्ये सगळ्या स्पर्धकांना एक पेटी देण्यात आली होती. यापैकी ज्याच्या पेटीतून शून्य बीबी करन्सी निघेल, तो स्पर्धक घराबाहेर पडणार असा हा टास्क होता. यावेळी ‘कोकणहार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू वालावलकर हिच्या पेटीतून शून्य बीबी करन्सी आली आणि तिचा प्रवास संपला. हे एलिमिनेशन सगळ्यांसाठीच धक्कादायक होते. अंकिता टॉप ३मध्ये पोहोचेल, असे अनेकांना वाटत होते. मात्र, तिची अशी एक्झिट सगळ्यांसाठी धक्कादायक ठरली.
अंकिता प्रभू वालावलकर घराबाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा स्पर्धकांना धक्का देण्यात आला. यानंतर लगेचच घरात आणखी एक एलिमिनेशन पार पडले. या एलिमिनेशनसाठी घरात उरलेल्या ‘टॉप ४’ स्पर्धकांच्या कुटुंबातील व्यक्तींना घरात पाठवण्यात आले होते. यावेळी सगळ्यांना एक-एक पाकीट देण्यात आले होते. यापैकी धनंजय पोवार यांच्या पाकिटातून एलिमेनेटेड असे लिहून आले. यामुळे घरातील धनंजय पोवार यांचा प्रवास संपला आणि ते घरातून बाहेर पडले.
धनंजय पोवार आणि अंकिता प्रभू वालावलकर हे या घरातील सगळ्यांचे लाडके होते. ही जोडी या घरातील बहीण-भावाची जोडी म्हणून खूप गाजली होती. डीपी दादा नेहमीच अंकिताची लहान बहिणीप्रमाणे काळजी घेताना दिसले होते. अगदी त्यांनी प्रत्येक पावलावर अंकिताला साथ दिली होती. गंमत म्हणजे बाहेर पडताना देखील हे दोघे एकापाठोपाठ एक बाहेर पडले आहेत.