Bigg Boss Marathi 5: निक्की तांबोळी झाली एलिमिनेट! अभिजीत सावंत की सूरज चव्हाण कोण उचलणार ट्रॉफी?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi 5: निक्की तांबोळी झाली एलिमिनेट! अभिजीत सावंत की सूरज चव्हाण कोण उचलणार ट्रॉफी?

Bigg Boss Marathi 5: निक्की तांबोळी झाली एलिमिनेट! अभिजीत सावंत की सूरज चव्हाण कोण उचलणार ट्रॉफी?

Published Oct 06, 2024 09:02 PM IST

Bigg Boss Marathi 5 Top 3 Elimination: आता 'बिग बॉस'च्या घरातून निक्कीची एक्झिट झाली आहे, आणि यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये थोडी निराशा आहे.

Bigg Boss Marathi 5 Top 3 Elimination
Bigg Boss Marathi 5 Top 3 Elimination

Bigg Boss Marathi 5 Top 3 Elimination : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनला २८ जुलैपासून सुरुवात झाली होती. आज या शोची सांगता होणार आहे. यंदा हा शो ७० दिवसांचा होता, ज्यामध्ये १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ग्रँड फिनालेत सहा स्पर्धकांनी प्रवेश केला होता. तर, प्रेक्षकांना देखील कोण ही ट्रॉफी जिंकणार याची उत्सुकता होती.या दरम्यान चार स्पर्धक या शर्यतीतून बाहेर पडले. तर, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे दोघे घराची लाईट बंद करून बाहेर आले. मात्र, त्या आधी निक्की तांबोळी घरातून बाहेर पडली. या एलिमिनेशनसाठी खास आलिया भट्ट या मंचावर आली होती.

बिग बॉस मराठीच्याया सीजनमध्ये एक स्पर्धक विशेषतः चर्चेत राहिली, ती म्हणजे निक्की तांबोळी.'बिग बॉस' हिंदीसारख्या रिअलिटी शोमधून आलेली निक्कीने'बिग बॉस मराठी'मध्ये स्वतःचं एक स्थान निर्माण केलं. तिच्या अनोख्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि'बाईईईईई' या वाक्यामुळे ती प्रेक्षकांची आवडती बनली. निक्कीने प्रत्येक स्पर्धकाशी वाद घालताना पाहायला मिळाली, त्यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

Bigg Boss Marathi 5: मोठं एलिमिनेशन! भावा-बहिणीची जोडी खेळातून बाहेर; अंकिता आणि धनंजयचा प्रवास संपला

निक्की राहिली नेहमीच चर्चेत!

निक्कीच्या वागणुकीमुळे तिचं नाव अनेकदा चर्चेत राहिलं. विशेषतः अरबाजसोबतच्या तिच्या नात्यामुळे ती प्रसिद्धी झोतात आली होती. तरीही, निक्कीने प्रत्येक टास्कमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करून प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे, ज्यांनी तिला सतत पाठिंबा दिला.मात्र, आता 'बिग बॉस'च्या घरातून निक्कीची एक्झिट झाली आहे, आणि यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये थोडी निराशा आहे. निक्कीच्या वागणुकीवरून ट्रोलिंग झालं असलं तरी तिच्या स्पर्धात्मक क्षमतेमुळे ती अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरली. तिच्या प्रवासाने 'बिग बॉस मराठी'च्या या पर्वाला विशेष रंगत दिली, आणि यामुळे ती एक ‘कॉन्टेन्ट क्वीन’ म्हणून ओळखली गेली.

या वर्षीच्या'बिग बॉस मराठी'च्या सीझनमध्ये निक्कीने चांगली छाप सोडली आहे, आणि तिचा हा प्रवास प्रेक्षकांच्या मनात कायमचा राहील. ग्रँड फिनालेत कोणता स्पर्धक विजेता होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.परंतु, निक्कीच्या धुमाकूळाने या सीझनचा अनुभव अद्वितीय केला आहे. निक्की बाहेर पडल्यानंतर या घरात अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे दोन स्पर्धक राहिले होते.

Whats_app_banner