Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात आता रोजच राडे बघायला मिळत आहेत. यावेळी बिग बॉस मराठीच्या घरात अनेक अमराठी लोक सामील झालेले पाहायला मिळत आहेत. नुकतंच या घरात पहिलं एलिमिनेशन पार पडलं आहे. कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील या घरातून बाहेर पडले आहेत. मात्र, ते बाहेर जातानाच एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षक आता ‘बिग बॉस मराठी ५’च्या एका स्पर्धकावर संतापले आहेत. इतकंच नाही तर, आता प्रेक्षक या स्पर्धकाला बाहेर काढण्याची मागणी देखील करत आहेत. हा स्पर्धक अरबाज शेख आहे. अरबाजवर आता प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत. अरबाजच्या एका कृतीने प्रेक्षक नाराज झाले आहेत.
नुकताच ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात ‘भाऊचा धक्का’ विशेष भाग पार पडला आहे. या भागात पहिल्या आठवड्यातील एलिमिनेशन देखील जाहीर करण्यात आले. पहिल्याच आठवड्यात या घरातून पुरुषोत्तमदादा पाटील बाहेर पडले आहेत. ‘रामकृष्ण हरी...’ म्हणत त्यांनी घरातील सगळ्या स्पर्धकांचा निरोप घेतला. ‘पुंडलिक वरदा हारी विठ्ठल...’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’ अशा जयघोषांनी अवघं घर दुमदुमलं होतं. सगळेच स्पर्धक यावेळी हरिनामाचा आणि छत्रपती शिवरायांचा जयघोष करताना दिसले होते. मात्र, अरबाज शेख हा हाताची घडी घालून मागे उभा राहिला होता. त्याने एकदाही जयघोष केला नाही. यामुळेच प्रेक्षक आता त्याच्यावर भडकले आहेत.
अरबाजच्या वागण्याने संतापलेल्या प्रेक्षकांपैकी एकाने लिहिले की, ‘कलर्समराठी मला एक सांगायचंय आवर्जून जेव्हा महाराज बाहेर जाताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हंटले, तेव्हा सगळे बोलत होते तेव्हा तो ‘अरमाज’ मात्र हाताची घडी घालून गप्प उभा होता. अशा वृत्तीच्या लोकांना काय बोलावं, याने हात जोडले असते ना सगळ्या महाराष्ट्राची मने जिंकली असती. पण, आता त्याला मत देण्यासाठी मला नाही वाटत कुणाचे हात धजावतील.’ आणखी एकाने लिहिले की, ‘अरे हा अरब कशाला घेतला, ज्याच्या तोंडातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जय येऊं शकत नाही, ते महाराष्ट्र काय देशात राहायच्या लायकीचे नाही. त्याच्या तोंडावर बघयाच महाराजांची नावे घेतल्यावर बारा वाजले होते. तू नाही म्हणाला तरी काही फरक नाही पडत महाराजांना... त्यांची उंची खूप मोठी आहे. अशी लोकं फक्त बिग बॉसच्या घरातून पहिली जायला पाहिजे अन् जेव्हा नॉमिनेट होईल घराबाहेर नक्की जाणार. याच्यापेक्षा सुरस छोटा पुढारी धनंजय किंवा त्या घरातील सर्व माणसे परवडली. पण, हा नको. बाकी पुरुषोत्तम दादा यांनी घरात राहून जी चांगली भूमिका मांडली अन् ते लोकांना पटलंही! दादा अजून घरात पाहिजे होते. जय जय राम कृष्ण हरी माऊली,छत्रपती शिवाजी महाराज की जय!’
आणखी एकाने लिहिले की, ‘परत जाताना माऊली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलले, तेव्हा हा अरबाज गप्प उभा होता, तरी हाबिग बॉसमराठीमध्ये कसा?’