मराठी मनोरंजनाचा बॉस अर्थात 'बिग बॉस मराठी'चा नवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाचा पाचवा सिझन हा प्रेक्षकांसाठी खास ठरत आहे. कारण सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये कलाकारांसोबतच काही सोशल मीडिया इन्फ्लूएंसर देखील सहभागी झाले आहेत. त्यातीलच एक चर्चेत असणारं नाव म्हणजे गोलीगत सूरज चव्हाण. सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असणारा सूरज चव्हाणने प्रेक्षकांना विशेष स्टाईलने आपलेसे केले आहे. पण आता मात्र त्याचे घरातील स्पर्धक जान्हवी किल्लेकरसोबत चांगलेच वाजले आहे.
जान्हवी बिग बॉसच्या घरातील स्वयंपाक घरात जेवण करत असते. त्यानंतर ती हातात असलेला टिश्यू फेकण्यासाठी जाते. तेथे जान्हवी आधी सूरज उभा असतो. तो त्याचा कचरा टाकतो आणि डस्टबीन बंद करतो. जान्हवी देखील त्याच वेळेत कचरा टाकायला जाते. पण सूरजने त्याचा कचरा टाकून डस्टबीन बंद केल्यामुळे तिचा राग अनावर होतो. ती सूरजला वाटेल तसे बोलते. तिला अनेकजण समजावण्याचा प्रयत्न करत असतात. शेवटी अंकिता सूरजला घेऊन तेथून निघून जाते.
सूरजला अंकिता गार्डन एरियामध्ये घेऊन येते आणि तेथे बसवते. तेथे डीपी दादा, पांडूरंग आणि घरातील इतर स्पर्धक बसलेले दिसतात. तेव्हा डीपी दादा सूरजचा किस्सा सांगतात. तेव्हा ते सूरजला विचारतात तू मुद्दाम तर केले नाही ना. तेव्हा सूरज हो मी मुद्दाम केले असे बोलतो. त्यावर पॅडी म्हणजेच पांडूरंग बरोबर केलस तू. मला वाटलच होतं हे असंच असेल म्हणून मी मध्येही नाही आले असे बोलताना दिसातात. यापूर्वी देखील सूरजने इतरांची कामे करण्यास नकार दिला होता. तो त्याचे काम करतो आणि बाजूला सरकतो. पण जान्हवी किल्लेकर उगाचच घरात भांडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात पहिला कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये घरातील स्पर्धक काय राडा घालणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तसेच अंकिता, निक्की, अरबाज, जान्हवी, वैभव, आर्या, अभिजित, पॅडी या स्पर्धकांपैकी कोण कॅप्टन बनणार हे देखील पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
वाचा: हे असलं घरात पाहण्यापेक्षा अडल्ट सिनेमा पाहिला असता; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’वर नेटकरी संतापले
सूरज चव्हाणने 'टिक टॉक'च्या पहिल्या दहात स्थान मिळवले होते. त्याचा गुलिगत हा डायलॉग तुफान चर्चेत असायचा. त्याला बिग बॉसच्या घरात पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. सूरजचे आता इन्स्टाग्राम अकाऊंटवर ९ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो मूळचा बारामतीचा आहे.