Bigg Boss Marathi Day 19: मराठी मनोरंजनाचा बॉस अर्थात 'बिग बॉस मराठी'चा नवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाचा पाचवा सिझन हा प्रेक्षकांसाठी खास ठरत आहे. कारण सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये कलाकारांसोबतच काही सोशल मीडिया इन्फ्लूएंसर देखील सहभागी झाले आहेत. त्यातीलच एक चर्चेत असणारं नाव म्हणजे गोलीगत सूरज चव्हाण. सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असणारा सूरज चव्हाणने प्रेक्षकांना विशेष स्टाईलने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. आता सूरजने त्याच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे.
छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज निक्की तांबोळी, छोटा पुढारी घन:शाम आणि सूरज चव्हाण हे बसून गप्पा मारताना दिसतात. तेव्हा निक्की सूरजला विचारते 'तूला प्रेमात धोका मिळाला आहे? बाईsss प्रेम केलं होतं तू... तू तिला बुक्कीत टेंगूळ तर दिलं नाही ना?' त्यावर सूरज थोडा भावूक होऊन उत्तर दोतो. 'नाही.. माझ्याबरोबर चांगली राहायची. बोलायची चालायची. पण तिला दुसरा चांगला मुलगा आवडला गोरापान... लगेच गेली मला सोडून. गोलीगत धोका दिला तिने मला.. मला खूप राग आला होता' असे सूरज म्हणाला.
पुढे सूरजने त्याच्या आयुष्यात काही तरी करुन दाखवण्याचा निर्णय घेतला. त्याने रिल्स तयार करुन, गाणी तयार करुन प्रसिद्धीचे शिखर गाठले. 'मग मी काही तरी करुन दाखवायचं ठरवसं. असला मोठा स्टार बनलो ना.. गोलीगत, झापुकझूपूक... गाणी वाजतात आपली..' असे सूरज म्हणाला. त्यावर निक्कीने कधी तिला बघितलं का परत? असा प्रश्न विचारते. त्यावर त्याने, 'आता नाही. चांगलं चाललं आहे तिझं.. उलट भारी वाटतय बाबा.. खूश आहे ती तिच्या आयुष्यात.. माझं पिल्ल..' असं उत्तर दिलं.
सध्या सोशल मीडियावर सूरज चव्हाणची फार चर्चा सुरु आहे. तो इतर सदस्यांप्रमाणे बोलत नसला तरी त्याला घरातील स्पर्धकांचे स्वभाव, त्यांच्या चाली कळाल्या आहेत. सूरजचा साधेपणा सर्वांना आवडत आहे. त्याला इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. सूरजने ट्रॉफी जिंकावी अशी सर्वांची इच्छा आहे.
वाचा: 'हापशीवर होणाऱ्या भांडणापेक्षा हे बेकार', अभिनेत्याची सूरजला पाठिंबा देत नवी पोस्ट
सूरज चव्हाणने 'टिक टॉक'च्या पहिल्या दहात स्थान मिळवले होते. त्याचा गुलिगत हा डायलॉग तुफान चर्चेत असायचा. त्याला बिग बॉसच्या घरात पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. सूरजचे आता इन्स्टाग्राम अकाऊंटवर ९ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो मूळचा बारामतीचा आहे.