Bigg Boss Marathi: निक्कीच्या चहामध्ये थोडी अक्कल किसून घालू का? जान्हवीच्या वक्तव्याने घरात होणार हंगामा!-bigg boss marathi 5 nikki vs janhvi should i put some sense in nikki s tea janhvi s statement will cause chaos ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi: निक्कीच्या चहामध्ये थोडी अक्कल किसून घालू का? जान्हवीच्या वक्तव्याने घरात होणार हंगामा!

Bigg Boss Marathi: निक्कीच्या चहामध्ये थोडी अक्कल किसून घालू का? जान्हवीच्या वक्तव्याने घरात होणार हंगामा!

Sep 04, 2024 05:51 PM IST

Bigg Boss Marathi 5 Nikki Vs Janhvi: पहिल्या आठवड्यापासून एकमेकींच्या खास बनलेल्या निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांच्यात आता मोठं वैर निर्माण झालं आहे.

Bigg Boss Marathi 5 Nikki Vs Janhvi
Bigg Boss Marathi 5 Nikki Vs Janhvi

Bigg Boss Marathi 5 Nikki Vs Janhvi: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात आता सगळीच समीकरणे बदललेली दिसत आहेत. पहिल्या आठवड्यात एकमेकांचे मित्र असलेले स्पर्धक आता एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत. रोजच या घरात वेगवेगळा हंगामा पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा या घरात शाब्दिक युद्ध रंगणार आहे. पहिल्या आठवड्यापासून एकमेकींच्या खास बनलेल्या निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांच्यात आता मोठं वैर निर्माण झालं आहे. महिन्याभरानंतर आता जान्हवी किल्लेकर निक्की तांबोळीच्या विरोधात शड्डू ठोकणार आहे. आता चहा बनवण्यावरून वाद होणार आहेत.

‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात आता पुन्हा एकदा निक्कीचा बिग बॉस सुरू झाला आहे. निक्की तांबोळीने घरात धिंगाणा घालायला सुरुवात केली आहे. नुकताच घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. यात निक्की तांबोळीला नॉमिनेट करण्यात आल्याने आता ती चांगलीच वैतागली आहे. यामुळे आता तिने घरातील कोणतीही कामे करणार नाही, तसेच कशालाही सहकार्य करणार नाही, असं तिने ठरवलं आहे. सध्या वर्षा उसगावकर या घराच्या कॅप्टन बनल्या आहेत. त्यामुळे आता निक्की सगळ्यांना त्रास देण्यास सुरुवात करणार आहे. यामध्ये तिने घरातील कोणत्याही कामास हात लावण्यास नकार तर दिला आहे. मात्र, ती सतत झोपून नियम मोडत आहे.

जान्हवी-निक्कीमध्ये होणार वाद

निक्की घरात सहकार्य करत नाही, हे बघून आता घरातील सदस्यांनी मिळून निक्कीला घरातील रेशन तसेच शिजणारे अन्न द्यायचे नाही, असा निर्णय घेतला होता. मात्र, निक्की आता घरात बनवण्यात आलेल्या जेवणाला हात लावणार आहे. यावरून जान्हवी चिडणार आहे. ती निक्कीला चांगलेच खडे बोल सुनावणार आहे. तुझ्यात जरा तरी लाज असेल, तर मी केलेल्या अन्नाला तू हात लावणार नाहीस, असं जान्हवी निक्कीला म्हणणार आहे. तर, निक्की आता अरबाजच्या ताटातून जेवणार आहे. यामुळे सगळेच चिडणार आहेत.

जान्हवी निक्कीला सुनावणार

आता जान्हवी घरातील सगळ्यांसाठी चहा बनवणार आहे. मात्र, मी निक्कीसाठी चहा बनवणार नाही, असे तिने जाहीर करून टाकले आहे. तिच्या या निर्णयावर सगळेच खूश झाले आहेत. मात्र, इतक्यात बिग बॉस जान्हवीला निक्कीसाठी चहा बनवण्याची विनंती करणार आहेत. आता बिग बॉसची मागणी आहे, म्हटल्यावर जान्हवीला देखील नकार देता येत नव्हता. त्यामुळे तिने चहा बनवण्याचा निर्णय तर घेतलाच. पण चहा बनवताना तिने बिग बॉसला विचारले की, निक्कीच्या चहात थोडी अक्कल किसून टाकू का? तिच्या या बोलण्यानंतर आता घरातील सगळ्यांनाच हसू आवरेना झाले आहे. यावरून घरात आता हंगामा पाहायला मिळणार आहे.

विभाग