Bigg Boss Marathi 5 Nikki Tamboli: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात आता प्रेक्षकांना रोजच नवा मसाला पाहायला मिळत आहे. रोजच या घरातील समीकरणं बदलताना दिसत आहेत. यात कधी स्पर्धकांची मैत्री पाहायला मिळते, तर कधी एकमेकांमधील वैर पाहायला मिळते. आता या घरात मोठा नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. यावेळी नॉमिनेशन टास्कमध्ये निक्की तांबोळी हिला देखील नॉमिनेट करण्यात आले आहे. त्यामुळे आता नॉमिनेट झालेले स्पर्धकांच्या वतीने त्यांच्या सोशल मीडिया टीम्सकडून आता व्होटिंग अपील करण्यात येत आहे. आता निक्की तांबोळीच्या टीमने देखील तिच्यावतीने व्होटिंग अपील केले आहे.
मात्र, निक्कीने व्होटिंग अपील करताच आता सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत आहे. नेटकरी आणि प्रेक्षक निक्की तांबोळी हिच्यावर प्रचंड संतापलेले दिसत आहेत. तिच्या व्हिडीओवर प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. सध्या बिग बॉस मराठीच्या घरातही निक्कीमुळे वातावरण बिघडल्याचे दिसत आहे. निक्कीने घरातील कोणतीही कामे करण्यास थेट नकार दिला आहे. त्यामुळे आता घरातील स्पर्धक तिच्यावर प्रचंड रागावले आहेत. वर्षा उसगांवकर कॅप्टन झाल्यामुळे निक्की तांबोळी घरातील सगळ्यांनाच खूप त्रास देताना दिसत आहे.
जवळपास सर्वच प्रेक्षकांना निक्कीचे वागणे खटकत आहे. काल तर निक्कीने हद्दच पार केली. तिने घरातील काम करण्यास नकार दिल्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी कमेंट करत निक्कीला या आठवड्यात जेलमध्ये टाका असे स्पष्ट म्हटले आहे. याचाच परिणाम तिच्या व्होटिंगच्या व्हिडीओवर देखील पाहायला मिळत आहे. निक्की तांबोळी हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रेक्षकांकडून मत मागण्यासाठी व्होट अपील करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
निक्कीने मतं मागण्यासाठी व्हिडीओ पोस्ट करताच एका युजरने लिहिले की, ‘चला चला ४ आठवडे झाले, बाहेर यायची वेळ आली’. आणखी एकाने लिहिले की, ‘बाईईईईईई तुला पण सपोर्टची गरज आहे का? नाही तेव्हा घरात बोलत असतेस मला कुणाची गरज नाही मग आता काय झालं बाईईईईईई?’ दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘खरं तर तुला कोण व्होट करत नाही पण बिग बॉसची टीम तुला नेहमी वाचवते काही तरी बहाणे देऊन, यावेळी पण तेच करतील तुला सेफ. डोन्ट वरी निक्की’. ‘इथून पुढे तरी हिला वोट करू नका. कोणाचाही बाप काढायचं.. चक्क ही जानव्हीचा बाप काढते... काम करायची दानत नाही हिची आणि ही काहीही बोलते’, असे देखील एकाने लिहिले आहे.