छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणून 'बिग बॉस' पाहिला जातो. आता लवकरच बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. कारण यंदाचा सिझन हा सर्वांसाठीच खास होता. या सिझनचे सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करणार असल्यामुळे सर्वांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता या सिझनचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये कोणता स्पर्धक सहभागी होणार हे दाखवण्यात आले आहे. मात्र, या स्पर्धकाचा चेहरा समोर आलेला नाही.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस मराठी सिझन पाच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकाची झलक दाखवली आहे. एक गायक पाठमोरा उभा असल्याचे दिसत आहे. आता हा गायक नेमका कोण आहे याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडीओ शेअर करत कलर्स वाहिनीने 'येतोय सुरांचा बादशाह ग्रँड प्रिमिअरचा ग्रँड परफॉर्मन्स. मराठी मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’चा ग्रँड प्रिमिअर या रविवारी २८ जुलै, रात्री ९ वाजता' असे कॅप्शन दिले आहे.
कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'हा तर अभिजीत सावंत आहे' असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने 'रोहित राऊत किंवा अभिजीत सावंत' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने 'स्वप्निल बांदोडकर येतो आहे वाटतं स्पर्धक म्हणून शंभर टक्के वाटते' अशी कमेंट केली आहे. सध्या सगळीकडे बिग बॉस मराठी सिझन ५ची चर्चा रंगली आहे.
वाचा: 'माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं', बिग बी आणि जया बच्चनच्या लग्नावर अशी होती वडिलांची प्रतिक्रिया
'बिग बॉस मराठी ५'ची उत्सुकता प्रेक्षकांना केव्हापासूनच होती. आता अखेर तो क्षण जवळ आला आहे. २८ जुलै रोजी बिग बॉस मराठी ५ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संध्याकाळी ९ वाजता या कार्यक्रमाचा ग्रँड प्रिमिअर सोहळा पार पडणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम सर्वांना पाहायला मिळणार आहे. तसेत जिओ सिनेमा या ओटीटी अॅपवर देखील हा कार्यक्रम पाहाता येणार आहे. या शोमध्ये यंदा कोणते कलाकार दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संबंधित बातम्या