मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi: "तंटा नाय तर घंटा नाय...", 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो पाहिलात का?

Bigg Boss Marathi: "तंटा नाय तर घंटा नाय...", 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो पाहिलात का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 04, 2024 07:23 PM IST

Bigg Boss Marathi 5: गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस मराठी ५'ची जोरदार चर्चा रंगली आहे. आता या शोचा नवा प्रोमो प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.

Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी ५चा नवा प्रोमो
Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी ५चा नवा प्रोमो

'बिग बॉस'म्हणजे मनोरंजनाचा बादशाह असलेला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम. 'कलर्स मराठी' आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं. अशातच आता पुन्हा एकदा नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख यंदा बिग बॉस मराठी ५चे सूत्रसंचालन करणार आहे. त्यामुळे अफलातून धमाल आणि कल्ला तर होणार आहे.
वाचा: मनी लाँड्रींग प्रकरणात निया शर्मा, करण वाही आणि क्रिस्टल डिसूझाची चौकशी

काय आहे नवा प्रोमो?

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊची 'लयभारी' स्टाईल पाहायला मिळाली. अन् आता नव्या प्रोमोमध्येही त्याचा कमाल स्वॅग पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस'च्या घरात आतापर्यंत ज्या पद्धतीने गेम प्लॅन, टास्क स्पर्धक खेळले. त्याप्रकारे या पर्वातील स्पर्धकांना खेळता येणार नाही. कारण स्पर्धकांचे प्लॅन तोडायला रितेश भाऊ सज्ज आहे. प्रोमोमध्ये रितेश म्हणतोय,"तंटा नाय तर घंटा नाय... ते प्लॅन बनवणार आणि मी तोडणार.. कारण आता मी आलोय कल्ला तर होणारच... तो पण माझ्या स्टाईलने".
वाचा: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची ५० लाख रुपयांची फसवणूक? काय झालं नेमकं वाचा

रितेश भाऊ देणार अनोख्या अंदाजात झटका!

महाराष्ट्रात लवकरच 'बिग बॉस'चा आवाज घुमणार आहे. आगळावेगळा भन्नाट रिअॅलिटी शो म्हणून 'BIGG BOSS'कडे पाहिलं जातं. हा कार्यक्रम जेवढा मनोरंजक आहे तेवढाच आव्हानात्मक आहे. या पर्वातही एकापेक्षा एक अतरंगी स्पर्धक अशक्य, अफलातून गोष्टी करताना दिसून येतील. तसेच रितेश भाऊ आपल्या अनोख्या अंदाजात झटकाही देणार आहे. 'बिग बॉस' मराठीचा नवा सीझन प्रेक्षकांना लवकरच कलर्स मराठी आणि JioCinema वर पाहता येईल.
वाचा: पाच जन्मातील बायकांची इच्छा पूर्ण करु शकेल स्वप्नील? 'बाई गं' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

कधी सुरु होणार बिग बॉस मराठी ५?

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनची घोषणा झाल्यापासून चर्चा सुरु आहे. आता नवा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर पाचव्या सिझनच्या प्रदर्शनाची तारीख घोषीत करण्यात आली की नाही? हे सर्वजण पाहात होते. पण अद्याप सिझनच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली नसल्यामुळे सर्वांचा हिरमोड झाला आहे.

WhatsApp channel