Bigg Boss Marathi 5: अखेर तो क्षण आलाच! अरबाज पटेल घरात आला अन् निक्कीला थेट उचलूनच घेतलं! पाहा व्हिडीओ
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi 5: अखेर तो क्षण आलाच! अरबाज पटेल घरात आला अन् निक्कीला थेट उचलूनच घेतलं! पाहा व्हिडीओ

Bigg Boss Marathi 5: अखेर तो क्षण आलाच! अरबाज पटेल घरात आला अन् निक्कीला थेट उचलूनच घेतलं! पाहा व्हिडीओ

Oct 05, 2024 10:38 AM IST

Bigg Boss Marathi 5 Latest Update: नुकताच ‘बिग बॉस मराठी ५’च्या रीयुनियन भागाचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये घराचा मुख्य दरवाजा उघडताच सगळेच स्पर्धक धावत घरात शिरणार आहेत.

Bigg Boss Marathi 5 Latest Update Reunion
Bigg Boss Marathi 5 Latest Update Reunion

Bigg Boss Marathi 5 Latest Update: ‘बिग बॉस मराठी ५’हा लोकप्रिय शो आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अवघ्या काही तासांतच ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाला त्याचा विजेता मिळणार आहे. मात्र, याच्या एक दिवस आधी या घरात नवा धमाका पाहायला मिळणार आहे. या घरात आता स्पर्धकांचे रीयुनियन होणार आहे. याचाच अर्थ या घरातील सगळे स्पर्धक पुन्हा एकत्र येणार आहेत. यामुळे घरात पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण पाहायला मिळणार आहे. मात्र, आता अरबाज पटेल घरात आल्यानंतर सगळ्यांच्या नजरा निक्कीकडे वळल्या आहेत. नुकताच या भागाचा प्रोमो समोर आला आहे.

नुकताच ‘बिग बॉस मराठी ५’च्या रीयुनियन भागाचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये घराचा मुख्य दरवाजा उघडताच सगळेच स्पर्धक धावत घरात शिरणार आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांची गळाभेट होणार आहे. यावेळी आधी अरबाज दिसला नसल्याने, असं वाटलं की तो येणार नाही. मात्र, इतक्यात तो धावत घरात येतो आणि कुणालाही न भेटता थेट निक्की तांबोळीच्या दिशेने धावतो आणि तिचा उचलून घेतो. यावर ती स्वतः देखील आधी शॉक होते. मात्र, नंतर दोघेही बेडरूम एरियात जातात. यावेळी निक्की आणि अरबाज यांच्यात काय खरं काय खोटं यावर चर्चा होणार आहे.

अरबाज निक्कीची समजूत घालणार!

फॅमिली वीकमध्ये आलेल्या निक्कीच्या आईने तिला अरबाज पटेलचा साखरपुडा झाला असल्याचे म्हटले होते. यामुळे निक्कीला चांगलाच धक्का बसला होता. इतके दिवस अरबाज अरबाज करणारी निक्की अचानक त्याच्यावर प्रचंड संतापली होती. आता अरबाज घरात येताच तिने त्याला याबद्दल विचारणा केली. ‘मला वाटलं असेल तुझं लफडं बाहेर’ असं म्हणत निक्कीने त्याला प्रश्न केले. मात्र, अरबाजने तिला उत्तर देत असं काहीच नाहीये असा निर्वाळा दिला. यामुळे आता निक्की पुन्हा एकदा अरबाजसोबत एकत्र पाहायला मिळणार आहे. मात्र, निक्की अरबाजला पुन्हा तिच्या आयुष्यात स्थान देईल का, हे लवकरच पाहायला मिळणार आहे.

मात्र, निक्की आणि अरबाज एकत्र पाहून आता सगळ्यांनाच सूरजच्या बोलण्याची आठवण आली आहे. सूरज निक्कीशी बोलताना तिला म्हणाला होता की, ‘अरबाज आल्यावर तू सगळ्यांना विसरशील आणि तिला जाऊन मिठी मारशील.’ त्यावर निक्कीने ‘मी असं काहीही करणार नाही’, असं म्हटलं होतं. पण आता सूरज जे बोलला तेच चित्र पाहायला मिळाल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे.

Whats_app_banner