Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा निक्कीने केला वर्षा उसगांवकर यांचा अपमान! मुलबाळ नसण्यावरून मारला टोमणा-bigg boss marathi 5 latest update once again nikki insulted varsha usgaonkar taunted for not having children ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा निक्कीने केला वर्षा उसगांवकर यांचा अपमान! मुलबाळ नसण्यावरून मारला टोमणा

Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा निक्कीने केला वर्षा उसगांवकर यांचा अपमान! मुलबाळ नसण्यावरून मारला टोमणा

Aug 14, 2024 04:54 PM IST

Bigg Boss Marathi 5 Latest Update: या आधी निक्कीने वर्षा यांना काळ्या मनाची बाई म्हणत त्यांचा पाणउतारा केला होता. मात्र, आता तिने त्यांना थेट मुलबाळ नसण्यावरून टोमणा मारला आहे.

पुन्हा एकदा निक्कीने केला वर्षा उसगांवकर यांचा अपमान! मुलबाळ नसण्यावरून मारला टोमणा
पुन्हा एकदा निक्कीने केला वर्षा उसगांवकर यांचा अपमान! मुलबाळ नसण्यावरून मारला टोमणा

Bigg Boss Marathi 5 Latest Update: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात आता नव्या वादांना तोंड फुटताना दिसत आहे. एकीकडे एक टीम प्रामाणिकपणे आपला खेळ खेळताना दिसत आहे. तर, दुसरीकडे एक टीम मात्र आपल्या अरेरावीपणाने सगळ्यांनाच हैराण करत आहे. पुन्हा एकदा टीम एचा हाच अरेरावी आणि उद्दामपणा या घरात पाहायला मिळाला आहे. नुकताच या घरात एक टास्क पार पडला. या टास्कसाठी घरात दोन बाहुले पाठवण्यात आले होते. या बाहुल्यांना नवजात बाळ समजून त्यांची काळजी घ्यायची होती. यासाठी ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात दोन टीम्स बनवण्यात आल्या होत्या.

या दोन टीमना मिळून एक एक बाळाची काळजी घ्यायची होती. मात्र, या टास्कमध्ये काही स्पर्धकांचा अमानुषपणा बघायला मिळाला आहे. खेळ खेळण्याच्या नादात निक्की तांबोळी आणि तिच्या टीमने दुसऱ्या टीमच्या बाहुल्याच्या अक्षरशः चिंध्या केल्या. या खेळात निक्कीने टीम बीच्या बहुल्याचा पाय खेचून फाडला. ती इतक्यावरच थांबली नाही, तर तिने उलट अरेरावी करण्यास सुरुवात केली. स्पर्धकांचा हा अवतार पाहून अखेर बिग बॉसने हा टास्क संपवण्याचा निर्णय घेतला. बिग बॉसने घरात घोषणा करून सगळ्या स्पर्धकांना लिव्हिंग एरियामध्ये बोलावले आणि हा खेळ इथेच थांबवत असल्याची घोषणा केली. यासोबतच त्यांनी स्पर्धकांची कानउघडणी देखील केली.

Bigg Boss Marathi 5: छोट्या पाहुण्यांमुळे घरात मोठे वाद! लंगोट बदलण्यावरून ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात राडा

बाळ सांभाळण्याच्या टास्कमध्ये निक्कीने मर्यादा ओलांडल्या!

यावेळी निक्की तांबोळी हिने पुन्हा एकदा वर्षा उसगांवकर यांचा अपमान केला. या आधी निक्कीने वर्षा यांना काळ्या मनाची बाई म्हणत त्यांचा पाणउतारा केला होता. मात्र, आता तिने त्यांना थेट मुलबाळ नसण्यावरून टोमणा मारला आहे. या घरात आल्यावर बोलण्याच्या ओघात वर्षा उसगांवकर यांनी आपल्याला मुलबाळ नसल्याची गोष्ट सगळ्यांसोबत शेअर केली होती. तर, या घरात बाळ सांभाळण्याचा टास्क मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसला होता. त्यांनी हा टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निक्की तांबोळी हिच्या बेशिस्त वागणुकीमुळे त्यांच्याकडील बाहुल्याचे पाय फाडले गेले.

पुन्हा एकदा वर्षा उसगांवकर यांचा अपमान!

यावेळी चिडलेल्या वर्षा उसगांवकर यांनी निक्की हिने बाळाच्या तंगड्या मोडल्या, असं विधान केलं. तर, निक्की तांबोळी हिने उत्तर देत त्यांना, ज्या बाईला मुल नाही, ती काय बाळ सांभाळणार? असं म्हटलं. हीच गोष्ट वर्षा उसगांवकर यांच्या मनाला लागली आहे. मात्र, निक्की तांबोळी हिच्या या वागण्यामुळे आता प्रेक्षकही आपला राग व्यक्त करताना दिसत आहे. जी व्यक्ती सतत मराठी मनोरंजन विश्वातील जेष्ठ अभिनेत्रीचा असा अपमान करते, तिला या घरात का ठेवतायत? असा संतप्त प्रश्न प्रेक्षक करत आहेत.

विभाग