संपूर्ण महाराष्ट्र गेली दोन वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता, तो क्षण आता जवळ आला आहे. नुकताच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनची घोषणा करण्यात आली आहे. या रिअॅलिटी शोची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. पण यावेळी शोमध्ये थोडे बदल पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत बिग बॉस मराठीचे चारही सिझन अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते. पण यंदा त्यांची जागा अभिनेता रितेश देशमुख घेताना दिसणार आहे. हे पाहून बिग बॉसमधील स्पर्धक अपूर्वा नेमळेकरने कमेंट केली आहे. तिच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
कलर्स मराठी आणि JioCinema वर मराठीतला सुप्रसिध्द शो 'बिग बॉस मराठी' चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रसिकांचा आवडता, मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठ्ठा शो “बिग बॉस मराठी” या भव्यदिव्य कार्यक्रमाचे होस्टिंग नामवंत बॅालीवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता , अवघ्या महाराष्ट्राचाच नाहीतर जगभरातील मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत असलेला “लय भारी” स्टार रितेश देशमुख करणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये शोबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वाचा: कार्तिकला बारशाचे आमंत्रण देऊन इंद्राने केला घोळ, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत पहिल्यांदाच मुक्ताने सुनावले सावनीला
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनमध्ये अपूर्वा नेमळेकर ही टॉप स्पर्धकांमध्ये होती. अगदीच थोडक्यात तिच्या हातून विजेती होण्याची संधी निसटली. अपूर्वाने सौंदर्य आणि खेळातील डाव पेच दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली होती. अपूर्वासोबत इतर स्पर्धकांचे झालेले वादही गाजले. आता अपूर्वाने बिग बॉस मराठीच्या नव्या होस्ट बाबत कमेंट करताना इन्स्टाग्रामवर स्टोरीतून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
वाचा: मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय
कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रोमो शेअर करण्यात आला. त्यामध्ये रितेश देशमुख होस्ट असल्याचे पाहायला मिळाले. या प्रोमोवर तिने 'फायनली... इसको बोलते है होस्ट.... रितेश सर वेलकम...' असे म्हटले आहे.
वाचा: आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले
महेश मांजरेकर यांची चावडी म्हटली की, स्पर्धकांसह प्रेक्षकदेखील टीव्हीकडे डोळे लावून बसायचे. मात्र, या सीझनमध्ये ही धमाल दिसणार नाहीये. तर, रितेश देशमुख त्याच्या हटके अंदाजात ‘बिग बॉस मराठी सीजन ५’चे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी रितेश देशमुखला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. कमेंटच्या माध्यमातून चाहते रितेश देशमुख याला शुभेच्छा देत आहेत. मात्र, या सीझनमध्ये कोण कोण झळकणार हे अद्याप समोर आलेले नाही. कोणते कलाकार या ‘बिग बॉस मराठी सीजन ५’ च्या पर्वात सहभागी होणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. लवकरच स्पर्धकांची यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या