Bigg Boss Marathi 5 Latest Update: ‘बिग बॉस मराठी ५’ हा लोकप्रिय टीव्ही शो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या आठवड्याच्या शेवटाला बिग बॉसच्या या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. दरम्यान आता घरातील एक-एक स्पर्धक एलिमिनेट होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या या घरात ८ स्पर्धक टिकून राहिले होते. मात्र, आता यापैकी एक स्पर्धक म्हणजेच पंढरीनाथ कांबळे म्हणजेच सगळ्यांचे लाडके पॅडी दादा आता घरातून एलिमिनेट झाले आहेत. आता पॅडी घरातून बाहेर पडल्यानंतर घरात एक नवा वाद उसळताना पाहायला मिळणार आहे.
सध्या ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात अभिजीत सावंत, सुरज चव्हाण, अंकिता प्रभूवालावलकर, धनंजय पोवार, वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी हे सात स्पर्धक उरले आहेत. एकीकडे टीम बीमधील अनेक सदस्य घरात असले तरी, आता त्यांच्यात काहीशी फूट पडताना दिसणार आहे. आता निक्की तांबोळीमुळे अभिजीत सावंत आणि अंकिता यांच्यात जोरदार वाद होताना दिसणार आहेत. घरात आता सात लोकच शिल्लक असताना कामाच्या वाटपावरून पुन्हा एकदा गदारोळ पाहायला मिळणार आहे. यावेळी देखील निक्की तांबोळी घरातील ड्युटी वाटून घेण्यावरून वाद घालताना दिसणार आहे. मात्र, पुन्हा एकदा अभिजीत निक्कीची बाजू घेऊन तिची ड्युटी स्वतःवर घेणार आहे. यामुळे आता अंकिता आणि अभिजीत यांच्यात कडाक्याची भांडणं होणार आहेत.
शेवटच्या आठवड्यात आता घरातील कामे कोण कोण करणार यावरून वाद रंगताना दिसणार आहे. निक्की तांबोळी हिने मी केवळ डायनिंगची ड्युटी करेन, असे म्हटल्याने आता अभिजीतने टॉयलेट आणि बाथरूमचं सगळं काम स्वतःकडे घेतलं. यामुळे आता अंकिता चिडली आहे. दरवेळी निक्कीची कामं घेऊन तू सगळ्यांसमोर जंटलमन बनतोयस, तर मग आमची कामं पण वाटून घे, असं म्हणत अंकिता चिडणार आहे. यामुळे आता अंकिता आणि अभिजीत यांच्यात खूप भांडणं होणार आहेत. नुकताच या भांडणाचा प्रोमो समोर आला आहे. यात दोघेही एकमेकांशी भांडताना दिसणार आहेत. तर, या वादात आता डीपीदेखील मध्ये पडणार आहेत.
‘बिग बॉस मराठी ५’ हा शो संपायला आता अवघे ६ दिवस उरले आहेत. मात्र, या काळात देखील घरात वाद रंगताना पहायला मिळणार आहेत. यंदाचा सीझन हा ७० दिवसांत संपवण्यात येणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी ‘बिग बॉस मराठी ५’चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.