Bigg Boss Marathi5 Latest Update: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात रोजच नवीन राडे पाहायला मिळत आहेत. या खेळात सहभागी झालेले स्पर्धक आता एकमेकांसोबत मारामारी करताना देखील दिसणार आहेत. या घरात होणारी भांडण, वादविवाद, हाणामारी यामुळे नेहमीच हा शो चर्चेत असतो. आता या नव्या सीझनमध्ये देखील अशीच क्रेझ पाहायला मिळत आहे. यंदाच्या सीझनमध्ये अनेक नवीन चेहरे या खेळात उतरलेले दिसत आहेत. १६स्पर्धकांपैकी काही जणांना हा खेळ सोडून घरी परतावे लागले. तर, काही मात्र अजूनही हा खेळ अतिशय जोमाने खेळताना दिसत आहेत. नुकतीच या घरात एक वाईल्ड कार्ड एन्ट्री देखील झाली आहे. आज घरात कॅप्टन्सीसाठी नवा टास्क होताना दिसणार आहे. तर, या कॅप्टन्सी टास्कमध्ये पुन्हा एकदा नक्की तांबोळीची लुडबुड पाहायला मिळणार आहे.
या दरम्यान निक्की आणि आर्यामध्ये चांगलीच लढत होणार आहे. या लढतीत हाणामारी देखील पाहायला मिळणार आहे. नुकताच ‘बिग बॉस मराठी ५’चा नवा प्रोमो समोर आला. या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांच्यामध्ये बाचाबाची सोबतच हाणामारी झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. बिग बॉसने कॅप्टन्सी टास्क म्हणून एक नवीन खेळ या घरातल्यांना दिला आहे. कॅप्टन्सीसाठीच्या या टास्कमध्ये स्पर्धकांना दिलेल्या डायमंडचे संरक्षण करायचे आहे. यावेळी आर्या जान्हवीला मदत करताना दिसणार आहे. जान्हवीकडे असेल डायमंड वाचवत असताना आर्या देखील तिला मदत करणार आहे.
दोघी आपल्या डायमंडचे रक्षण करत असताना निक्की तांबोळी आता यात मध्ये पडून दोघींनाही त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी आर्या जान्हवीवर डायमंडच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवून निक्कीला पकडून धरणार आहे. तर, यावेळी दोघींमध्ये चांगलीच हाणामारी होताना दिसणार आहे. यावेळी आर्या निक्कीच्या कानाखाली आवाज काढणार आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी एका रूममधून रडत बाहेर येत, ‘आर्याने मला मारलं, बिग बॉस तुम्ही तिला शिक्षा करा. मी हे सहन करून घेणार नाही’, असं म्हणताना दिसत आहे. तर, आर्या जे झालं त्यात माझी काही चूकच नव्हती, असं म्हणताना दिसत आहे. मात्र, नक्कीच्या तमाशा नंतर ‘मला या गोष्टींशी काही घेणं देणं नाही, जे व्हायचं ते होऊ दे. घरी गेले तर गेले’, असं म्हणत आर्यानं थेटच पंगा घेतलाय. आता निक्की तांबोळी आर्याला घराबाहेर काढा किंवा मला तरी घराबाहेर काढा, असं बिग बॉसला म्हणताना दिसतीये. आजच्या भागात हा नवा ड्रामा पाहायला मिळणार आहे.