Bigg Boss Marathi 5 Grand Finale :‘बिग बॉस मराठी ५’च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. काहीच वेळांत या शोला त्यांचा महाविजेता मिळणार आहे. आता या ग्रँड फिनाले सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दोन आठवड्यानंतर आता या शोचा होस्ट रितेश देशमुख परतला आहे. त्याच्यासोबतच आता या सोहळ्यात कल्ला होणार आहे. या सोहळ्याची सुरुवात रितेश देशमुख याने सगळ्या सदस्यांचे स्वागत करत केली आहे. या सोहळ्याला बिग बॉस मराठी ५च्या सगळ्या स्पर्धकांनी हजेरी लावली आहे. यावेळी रितेश देशमुख याने घन:श्यामची फिरकी घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. तर, घरातील टॉप ६ स्पर्धकांनी धमाकेदार परफॉर्मन्स देऊन सोहळ्याची सुरुवात केली आहे.
या सोहळ्याला सुरुवात होताच रितेश देशमुख याने स्पर्धकांचे तोंडभरून कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. शेवटच्या दिवशी रितेश टॉप ६ स्पर्धकांना कौतुकाची थाप देताना दिसला आहे. स्पर्धकांनी एका धमाकेदार गाण्यावर डान्स परफॉर्मन्स करत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सुरुवात केली आहे. या सोहळ्यात पहिल्यांदाच रितेश देशमुख प्रत्येक स्पर्धकाचं वैयक्तिक कौतुक करताना दिसला आहे. आता या घरात ६ सदस्य उरले आहेत. यापैकीच एक आता या सीझनचे महाविजेतेपद पटकावताना दिसणार आहे.
‘बिग बॉस मराठी ५’चा हा ग्रँड फिनाले सोहळा रसिक प्रेक्षकांना ‘कलर्स मराठी’ या वाहिनीवर आणि जिओ सिनेमा या ओटीटीवर संध्याकाळी ६ वाजल्यापासून सुरू झाला आहे. सध्या या घरात टॉप ६ स्पर्धक उरले आहेत. अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, अंकिता प्रभू वालावलकर, जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी यांनी बिग बॉस मराठीच्या शेवटच्या दिवसापर्यंत घरात टिकून राहिले आहेत. आता या सहा जणांपैकी एक या सीझनची ट्रॉफी जिंकून विजेता किंवा विजेती ठरणार आहे. आता ही ट्रॉफी कोण उचलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेले ७० दिवस सगळीकडे 'बिग बॉस मराठी ५'ची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. रितेश देशमुखने ‘भाऊचा धक्का’ देत स्पर्धकांचं कधी कौतुक केलं, तर कधी त्याने स्पर्धकांना आरसा देखील दाखवला. मात्र, आता शेवटच्या दिवशी खुद्द बिग बॉसने होस्ट रितेश देशमुखचं कौतुक केलं आहे. ‘बिग बॉस’चा ‘लयभारी होस्ट’ म्हणत रितेश देशमुखचं कौतुक करण्यात आलं.
संबंधित बातम्या