Bigg boss Marathi 5: छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाचा सिझन हा सर्वांसाठी अतिशय वेगळा ठरला आहे. या सिझनचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करत आहे. त्यासोबतच शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमध्ये कलाकारांसोबतच इन्फ्लूएंसर देखील दिसत आहेत. त्यात महाराष्ट्राचा छोटा पुढारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घन:श्याम दरवडेचा देखील सहभाग आहे. आता घन:श्यामने अभिनेत्री निक्की तांबोळीची फिरकी घेतली आहे.
बिग बॉस मराठीच्या आजच्या भागाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये वैभव निक्कीला विचारत आहे की, 'अहो कुठे आहे तुझे?' त्यावर निक्की उत्तर देत म्हणते की मला काय माहिती तो कुठे आहे? ते ऐकून वैभव लगेच मजेशीर अंदाजात म्हणतो की, 'तुम्हाला नाही तर कोणाला माहिती असणार वहिनी.' वैभवने वहिनी म्हटल्यावर निक्की लगेच लाजते. ती तेथून उठून निघून जाते.
वैभवचे बोलण्या ऐकल्यानंतर छोटा पुढारी निक्कीच्या पाठी जातो आणि म्हणतो 'वहिनाला वहिनी नाही म्हणणार तर काय म्हणणार.' निक्की त्यावर फार रिअॅक्ट करत नाही. घन:श्याम मात्र लगेच संधीचे सोने करतो. 'गोरी गोरी पान, फुलासाखरी छान.. दादा मला एक वहिणी आण... पण आगाऊ नको, डांबरट नको.. चांगल्या मनाची वहिनी आण' असे गाणे घन:श्याम बोलतो. ते ऐकून निक्की चकीत होते.
गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची 'बिग बॉस मराठी'च्या घरातील एण्ट्री सर्वांनाच चकीत करणारी ठरली. छोटा पुढारी म्हणजे घन:श्याम दरवडे. घन:श्याम दरवडेच्या प्रत्येक स्टेटमेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो. आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणारा हा एक पुढारी आहे.
वाचा: 'तुम सब उसको डरा सकते हो, हरा नहीं सकते', उत्कर्ष शिंदेचा गोलिगत सूरज चव्हाणला पाठिंबा
पहिल्यांदाच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण आणि पुरुषोत्तमदादा पाटील हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. त्यामधील कोणत्या स्पर्धकाचा प्रवास आज संपणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या