इंडस्ट्री गाजवणाऱ्या वर्षा उसगावकरांपेक्षा सूरज चव्हाणचे फॉलोअर्स जास्त, वाचा कोणाचे किती फॉलोअर्स
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  इंडस्ट्री गाजवणाऱ्या वर्षा उसगावकरांपेक्षा सूरज चव्हाणचे फॉलोअर्स जास्त, वाचा कोणाचे किती फॉलोअर्स

इंडस्ट्री गाजवणाऱ्या वर्षा उसगावकरांपेक्षा सूरज चव्हाणचे फॉलोअर्स जास्त, वाचा कोणाचे किती फॉलोअर्स

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 31, 2024 09:15 PM IST

Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये कोणाचे किती फॉलोअर्स आहेत. चला जाणून घेऊया...

Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi 5

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाचा सिझन हा सर्वांसाठी अतिशय वेगळा ठरला आहे. या सिझनचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करत आहे. त्यासोबतच शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमध्ये कलाकारांसोबतच इन्फ्लूएंसर देखील दिसत आहेत. सोशल मीडियावर या इन्फ्लूएंसरची हवा पाहायला मिळते. चला पाहूया कोणाचे किती फॉलोअर्स आहेत.

कलाकार आणि त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोअर्स

  • मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक दशकं गाजवणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर या बिग बॉसच्या घरात सहभागी झाल्या आहेत. त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर २ लाख ४६ हजार फॉलोअर्स आहेत.
  • मराठी मनोरंजनाचा राजा म्हणून अभिनेता पॅडी कांबळे ओळखला जातो. आता त्याची बिग बॉस मराठीच्या घरात एण्ट्री झाली आहे आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या पॅडी कांबळेलेचे ९ हजार फॉलोअर्स आहेत.
  • अभिनेता निखिल दामले याचे इन्स्टाग्रामवर ३७ हजार फॉलोअर्स आहेत
  • इंडियन आयडल जिंकलेला गायक अभिजीत सावंत बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात दिसत आहे त्याचे सोशल मीडियावर ३ लाख ३४ हजार फॉलोअर्स आहेत.
  • बारामतीचा रांगडा गडी अभिनेता वैभव चव्हाण वैभव चव्हाणचे ३७ हजार फॉलोअर्स आहेत.
  • महाराष्ट्राची यंग रॅप स्टार आर्या जाधवची बिग बॉस मराठीच्या घरातील एण्ट्री एकदम ग्रँड होती. तिचे सोशल मीडियावर ३ लाख फॉलोअर्स आहेत.
  • अभिनेता अरबाज पटेलचे १८ लाख फॉलोअर्स आहेत.
  • अभिनेत्री इरिना रुडिकोवा ही अंतरराष्ट्रीय कलाकार आहे. तिचे सोशल मीडियावर १ लाख ५४ हजार फॉलोअर्स आहेत.
  • मूळची औरंगाबादची असणारी निक्की तांबोळी बिग बॉसचे घर गाजवत आहे. तिचे सोशल मीडियावर ५४ लाख फॉलोअर्स आहेत.
  • नेहमी राजकीय सभा गाजवणारा छोटा पुढारी म्हणून ओळखला जाणारा घनःश्याम दरवडेचे १ लाख ५९ हजार फॉलोअर्स आहेत.
  • जीव माझा गुंतला या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री योगिता चव्हाणचे २ लाख १९ हजार फॉलोअर्स आहेत.
  • भाग्य दिले तू मला मालिकेत सानियाची भूमिका साकारणी जान्हवी किल्लेकरचे २ लाख ४५ हजार फॉलोअर्स आहेत.
  • कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकरचे सोशल मीडियावर ५ लाख ६४ हजार फॉलोअर्स आहेत.
  • घरी आई आणि बायकोच्या आदेशाबाहेर न जाणारे धनंजय पोवारचे १२ लाख फॉलोअर्स आहेत.
  • मॉर्डन आणि टेक्नो सेवी असणारे नव्या युगाचे कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांचे १ लाख ४० हजार फॉलोअर्स आहेत.
  • 'गोलीगत धोका' असे म्हणत अनेक रिल्सच्या माध्यमातून अनेकांना वेड लावणाऱ्या सूरज चव्हाणचे ९ लाख १६ हजार फॉलोअर्स आहेत.

वाचा: 'गुलिगत' सूरज चव्हाणचे एका दिवसाचे मानधन ऐकून कलाकारांना धक्का, वाचा रिल स्टारच्या मानधनाविषयी

सोशल मीडियावर अरबाज आणि धनंजय हे दोघे एकमेकांना टफ देत आहेत. त्यात सुरज चव्हाण देखील फार मागे नाही. आता या सगळ्यामधील कोणता स्पर्धक हा बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार हे पाहण्यासारखे आहे.

Whats_app_banner