Bigg Boss mid week Eviction: अंकिता या वेळी घराबाहेर; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss mid week Eviction: अंकिता या वेळी घराबाहेर; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

Bigg Boss mid week Eviction: अंकिता या वेळी घराबाहेर; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 03, 2024 03:49 PM IST

Bigg Boss mid week Eviction: आज 'बिग बॉस मराठी'च्या घरात मिडविक इविक्शन होणार आहे. त्यामुळे कोणता स्पर्धक घराबाहेर पडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi 5: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. रविवारी या शोचा ग्रँड प्रिमियर पार पडणार आहे. शो अंतिम टप्प्यात असताना या आठवड्यात मिडवीक इविक्शन होणार आहे. त्यामुळे घरातील कोणता स्पर्धक बाहेर जाणार हे पाहाण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत अंकिता वालावलकर घराबाहेर जाणार असल्याचे म्हटले आहे.

सहा सदस्य झाले नॉमिनेट

'बिग बॉस मराठी' हा १०० दिवसांचा असणारा अवघ्या ७० दिवसांवर आला आहे, याबाबत ‘बिग बॉस’ने अधिकृत घोषणा केली. ‘बिग बॉस’च्या घरात आता ७ सदस्य उरले आहेत. या सात सदस्यांपैकी निक्की तांबोळीने शेवटच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ‘तिकीट टू फिनाले’ जिंकून फिनालेमध्ये जाण्याची बाजी मारली. निक्की तांबोळी ही ‘बिग बॉस’ सीझन ५ ची पहिली ग्रँड फायनलिस्ट आहे. त्यामुळे आता उर्वरित सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

आज बिग बॉसच्या घरात मिड वीक इविक्शन पार पडणार आहे. सहा नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी एकाचा प्रवाज हा संपणार आहे. ज्या स्पर्धकाला कमी वोट मिळाले तो सदस्य घराबाहेर जाणार आहे. आता हा सदस्य कोण असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये मिड वीक एव्हिक्शनबाबत बिग बॉस बोलताना दिसत आहेत.

काय आहे प्रोमो?

बिग बॉस मराठीच्या प्रोमोमध्ये डीजे kratex हा घरात आला असून स्पर्धकांना आपल्या तालावर नाचवताना दिसत आहे. धमाल मजा-मस्ती करत असताना बिग बॉस मिड वीक एवक्शनची आठवण करुन देतात. त्यामुळे वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि जान्हवी यांच्यामधील कोण घराबाहेर पडणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: तोंडाला रुमाल बांधलेल्या सूरजला हॉटेलमध्ये मिळत नव्हती एण्ट्री, रुमाल काढताच गर्दी जमली अन्...

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सध्या सोशल मीडियावर बिग बॉसचा हा प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करुन आजच्या भागात अंकिता वालावलकर घरातून बाहेर पडणार असल्याचे म्हटले आहे. ‘बाय बाय माका तुका’, ‘अंकिता या वेळी आहे घराबाहेर’, ‘अंकिता आज घराबाहेर आली’, “अंकिता घराबाहेर आली, हे धक्कादायक आहे’, ‘अंकिता एलिमिनेट होणार’ अशा अनेक कमेंट दिसत आहेत. आता नक्की अंकिता घराबाहेर जाणार का हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Whats_app_banner