Bigg Boss Marathi Video: बाईsssss तुझा माझ्यावर विश्वास नाही का?; अभिजीतने केली निक्कीची नक्कल-bigg boss marathi 5 abhijeet swant mimicry of nikki tamboli video goes viral ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi Video: बाईsssss तुझा माझ्यावर विश्वास नाही का?; अभिजीतने केली निक्कीची नक्कल

Bigg Boss Marathi Video: बाईsssss तुझा माझ्यावर विश्वास नाही का?; अभिजीतने केली निक्कीची नक्कल

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 25, 2024 12:42 PM IST

Bigg Boss Marathi Video: 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन दिवसेंदिवस रंगत चालला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये अभिजीत निक्कीची नक्कल करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू अनावर होईल...

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi Day 60: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन दिवसेंदिवस रंगत चालला आहे. या शोमध्ये पार पडणारे टास्क हे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. नुकताच 'बिग बॉस मराठी'च्या घरात एक टास्क पार पडला. या टास्कमध्ये अभिजीत सावंतने निक्की तांबोळीची नक्कल केली आहे. तर अंकिता वालावलकरने जान्हवी किल्लेकरची नक्कल केली. दोघांचा हा नक्कल करतानाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला ही हसू अनावर होईल.

डीपी दादांनी दिली अभिजीत आणि अंकिताला टास्क

'बिग बॉस मराठी'च्या घरात आज एक अनोखा टास्क पार पडणार आहे. बिग बॉसने दिलेल्या टास्कदरम्यमान मालक आणि सांगकामे यांच्यात धमाल दिसणार आहे. धनंजय पोवार हे मालक आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेली सर्व कामे सांगकाम्यांना ऐकावी लागणार आहेत. आजच्या भागात मालक डीपी दादा सांगकामे अभिजीतला निक्कीची नक्कल करायला सांगणार आहेत. अभिजीतने निक्कीची केलेली नक्कल पाहून घरात एकच हशा पिकला आहे.

काय आहे व्हिडीओ

सोशल मीडियावर बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये डीपी दादा अभिजीतला निक्कीची तर अंकिताला अरबाजची नक्कल करायला सांगतात. सीन असा असतो की जान्हवी अरबाजला निक्कीविरोधात भडकवते. यामुळे निक्कीची रिअॅक्शन काय असणार आणि अरबाजवर काय करणार? डीपी दादा अभिजीतला निक्कीची नक्कल करायला लावतात. दरम्यान निक्कीची नक्कल करत अभिजीत म्हणतो, "बाई... तुला माझ्यावर विश्वास आहे की नाही.. तर तू जातो का तिकडे...असं का करतोस तू?" त्यानंतर निक्की अभिजीतला माझी नक्कल करतोस का? असे विचारते.
वाचा: अशी मी मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी; 'फुलवंती'मधील पहिल्या गाण्याने लावले प्रेक्षकांना वेड

डीपी दादांनी व्यक्त केली नाराजी

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात डीपी दादा आणि अभिजीत अंकिताबद्दल बोलताना दिसणार आहेत. डीपी दादा म्हणतात, "ती म्हणते अरबाजची गरज का आहे आता?" अभिजीत विचारतो, "पॅडी दादांना तुम्ही पकडलेलं म्हणून." अंकिताच्या वागण्यामुळे डीपी दादा थोडे नाराज असतात. आता ते अंकिताची स्पष्ट बोलणार की हा आलेला राग मनात ठेवणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सूक आहेत. तसेच आजच्या भागात बिग बॉसने स्पर्धकांना दिलेला टास्क हा एकदम मजेदार असल्याचे पाहायला मिळत आहेत. दरम्यान, जान्हवीच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. या अश्रूंचे मागे काय कारण आहे हे देखील आजच्या भागात उघड होणार आहे.

Whats_app_banner