बिग बॉसच्या स्पर्धकावर होता १८ वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा आरोप, वाचा काय आहे प्रकरण?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  बिग बॉसच्या स्पर्धकावर होता १८ वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा आरोप, वाचा काय आहे प्रकरण?

बिग बॉसच्या स्पर्धकावर होता १८ वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा आरोप, वाचा काय आहे प्रकरण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 14, 2024 04:02 PM IST

सध्या बिग बॉस हिंदीचे १८वे सिझन सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या सिझनमधील एका स्पर्धकावर १८ वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता.

रजत दलाल
रजत दलाल

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. सध्या सगळीकडे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसच्या १८व्या सिझनची चर्चा रंगली आहे. यंदाच्या सिझनमधील स्पर्धक रजत दलाल हा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तो फार अॅक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे कोणाशी ना कोणाशी भांडणही होत असते. घराबाहेर देखील रजत वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याने स्वत: बिग बॉसच्या घरात तरुंगात जाण्याची भीती वाटत असल्याचे सांगितले. थोडा शोधत घेतला असता असे समोर आले की रजतवर १८ वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता.

नेमकं काय झालं होतं?

समोर आलेल्या माहितीनुसार, यावर्षी जूनमध्ये रजतवर एका 18 वर्षीय मुलाचे अपहरण केल्याचा आरोप होता. मुलाच्या म्हणण्यानुसार, रजत आणि तो एकाच जिममध्ये होते. एके दिवशी रजतसोबतचा फोटो शेअर करून मुलाने सोशल मीडियावर लिहिले की, राजू रोज सकाळी जिममध्ये चेहरा दाखवून माझा दिवस खराब करतो. रजतला हे आवडले नाही आणि त्याने त्या मुलाला शिवीगाळ केली. त्यानंतर जबरदस्तीने घरातून उचलून नेले. इतकंच नाही तर रजतने त्याला मारहाण केली होती आणि त्याचा व्हिडीओ बनवला होता. इतकंच नाही तर रजतने मुलाला बाथरूमही साफ करायला लावलं.
वाचा: आलियाच्या बॉडीगार्डचं गैरवर्तन, सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला...; व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले!

एकता कपूरने घेतला क्लास

वीकेंड का वार एपिसोडमध्ये टीव्ही क्वीन एकता कपूरने हजेरी लावली होती. त्यावेळी रजतने एकता कपूरला सांगितले होते की, त्याला तुरुंगाची भीती वाटते. मात्र, का भीती वाटते याबाबत त्याने अधिक माहिती दिली नाही. खरं तर एकताने रजतच्या चुकीच्या भाषेसाठी क्लास घेतला होता.

Whats_app_banner