बिग बॉस हा एक असा रिअॅलिटी शो आहे ज्याने अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. आता लवकरच या शोचा नवा सीझनही सुरू होणार आहे. बिग बॉस हिंदीच्या १८ व्या सिझनची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, सलमान खानने या शोचा प्रोमोही शूट केला आहे. सलमान खानने गुरुवारी, ५ सप्टेंबर रोजी नवीन सीझनचा प्रोमो शूट केला. प्रोमो शूटच्या बातमीने चाहते खूप खूश आहेत. त्याच वेळी सलमान खानने शोच्या थीमबद्दलही हिंट दिली आहे.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, यावेळी शोची थीम आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर केंद्रित असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस १८ ची थीम यावेळी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याभोवती फिरणार आहे. शूटिंगदरम्यान सलमान खानने टीमसोबत मस्ती केली. या महिन्याच्या अखेरीस या शोचा प्रोमो रिलीज होऊ शकतो. चाहत्यांना सलमान खान या टाइमलाइनबद्दल बोलताना दिसेल. घरा च्या डिझाईनमध्ये आणि शोच्या फॉरमॅटमध्येही याचा समावेश केला जाणार आहे.
सध्या बिग बॉस १८ च्या थीमबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. यंदाच्या सिझनमध्ये मागील सिझनमधील स्पर्धक सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महिन्याच्या अखेर प्रदर्शित होणाऱ्या प्रोमो मध्ये सलमान खान यंदा काय थिम असणार याविषयी बोलताना दिसणार आहे. त्यामुळे बिग बॉस १८ चे घर कसे असणार याबाबत लवकरच उलघडा होणार आहे.
वाचा: २ शर्ट आणि तुटलेली चप्पल घालून शोसाठी आलेल्या सूरज चव्हाणकडे डिझायनर कपडे कसे?
अनिल कपूरने बिग बॉस ओटीटी सीझन 3 शूट केल्यापासून लोकं असा अंदाज लावू लागले होते की सलमान खान बिग बॉस सीझन १८ होस्ट करणार नाही. मात्र, आता सलमान खानने प्रोमो शूट करून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शोच्या स्पर्धकांबद्दल बोलायचे झाले तर सोशल मीडियावर काही नावांची चर्चा सुरू आहे. या नावांमध्ये टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीच्या नावाचा समावेश आहे. मात्र निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत यादी समोर आलेली नाही. त्या मुळे आणखी कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.