दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाचा 'पुष्पा २ : द रूल' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कमाई केली आहे. आता चित्रपटाने जवळपास ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसत आहे. दरम्यान, एका बिग बॉस मराठीच्या स्पर्धकाने कृपया ‘पुष्पा २’ पाहण्यासाठी पैसे घालवू नका असे स्पष्ट मत मांडले आहे.
सध्या सगळीकडे 'पुष्पा २ : द रूल' या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते. अनेक कलाकार देखील हा सिनेमा पाहण्यासाठी जात आहेत. अशातच बिग बॉस मराठी सिझन पाच मधील स्पर्धक, इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर ही देखील हा सिनेमा पाहण्यासाठी गेली होती. सिनेमा पाहून आल्यावर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट मत मांडले आहे. ज्यांनी 'पुष्पा २ : द रूल' हा सिनेमा पाहिलेला नाही त्यांच्यासाठी अंकिताची पोस्ट ही विचार करायला भाग पाडणारी आहे.
अंकिताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला 'पुष्पा २ : द रूल' सिनेमाचा थोड्यात रिव्ह्यू दिला आहे. तिने “अभिनय १००/१००. स्टोरी काहीच नाही. पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग यापेक्षा खूप चांगला होता. कृपया तुम्ही तुमचे पैसे वाया घालवू नका. मला वाटतं करमणूक हे एक सशक्त माध्यम आहे आणि जे चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात ते काळजीपूर्वक चालले पाहिजेत” असे म्हटले आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेल्या सिनेमाविषयीचे अंकिताचे वक्तव्य लक्षवेधी ठरले आहे.
Pushpa 2 The Rule review : 'पुप्षा २' पाहायला जाताय ? थांबा ! आधी हे वाचा आणि मग निर्णय घ्या
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २ : द रुल'ने बॉक्स ऑफिसवर आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. सर्व भाषांमध्ये १७४.९ कोटींहून अधिक कमाई केल्यानंतर, या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी आपली मजबूत धाव सुरू ठेवली आहे. भारतात ९०.०१ कोटींची कमाई केली. Sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, दोन दिवसात २६५ कोटींच्या मोठ्या कलेक्शनसह, 'पुष्पा २ : द रूल' ने अधिकृतपणे जगभरात ४०० कोटी कलेक्शनचा टप्पा ओलांडला आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पा राजच्या व्यक्तिरेखेवर लोकांचे किती प्रेम आहे हे या जबरदस्त कलेक्शनमधून दिसून येते.
संबंधित बातम्या