बिग बॉस मराठी हा रिअॅलिटी शो नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. या शोमध्ये सहभागी होणारे कलाकार हे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचतात. त्यांचे बिग बॉसच्या घरातील वागणे हे कायमच प्रेक्षकांच्या मनात लक्षात राहाते. आता बिग बॉस मराठीमधील अभिनेत्री वीणा जगताप ही छोट्या पडद्यावरील एका मालिकेत एण्ट्री करणार आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे. आता तिच्या आगामी मालिकेविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
अभिनेत्री वीणा जगताप ही कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ मालिकेत दिसणार आहे. ही मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर असून मालिकेत येणारे एक नवे वळण प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. रमा राघवच्या पत्रिकेत असलेला विरह टळावा यासाठी पुरोहितांनी मनावर दगड ठेऊन रमा राघवला वनवासाला पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा वनवास रमा राघवच्या आयुष्यात नवे वादळ आणणारा ठरणार असून विक्रम या पात्राचा त्यांच्या आयुष्यात प्रवेश झाला आहे.
वाचा: बॉबी देओल आधी 'या' अभिनेत्रीने डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून केला 'जमाल कडू' डान्स, वर्षांनी व्हिडीओ व्हायरल
आता या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येत आहे. रमा राघवचा सुरू झालेला वनवास आणि त्यात विक्रम या असुराचा प्रवेश या पार्श्वभूमीवर वीणाचे एक नवे पात्र मालिकेत प्रवेश करत आहे. लोकप्रिय अभिनेता अद्वैत दादरकर पाठोपाठ वीणाचा या मालिकेतील प्रवेश प्रेक्षकांसाठी सुखद धक्का आहे. वीणाची नक्की कोणती भूमिका मालिकेत आहे ? रमा राघवच्या आयुष्यावर त्याचा काय प्रभाव पडणार? हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना कळणार आहे. वीणाची मालिरेत एण्ट्री झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेच्या आगामी भागांविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
वाचा: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर चाहत्याने फेकली पाण्याची बाटली, गायिकेने व्यक्त केला संताप
कलर्स मराठीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतून वीणाने टेलिव्हिजनवर पदार्पण केले होत. त्यानंतर तिने बिग बॉस मराठीमध्ये सहभाग घेतला. बिग बॉसमधून ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. त्यानंतर आता पुन्हा एकदा वीणा कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती रमा राघव या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
वाचा: मुंबईत मराठी माणूस चालणार नाही?; दिग्दर्शक अक्षय इंडिकर याची संतप्त पोस्ट व्हायरल